सध्या ‘बिग बॉस’ ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. यामध्ये येणाऱ्या सर्व सदस्यांबद्दलही बोलले जात आहे. यामध्ये कलाकार, पत्रकार, युट्यूबर, सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर , अशा क्षेत्रातील काही निवडक व्यक्ती समोर आल्या आहेत. वडापाव गर्लपासून युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन पत्नींबरोबर सहभागी झाला आहे. त्यामुळे हे पर्व अधिक रोचक असणार आहे असा अंदाज सगळ्यांनी बांधला आहे. आजपर्यंत सोशल मीडियावर अरमानच्या खासगी आयुष्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. दोन पत्नी असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. मात्र आता या सगळ्याला अरमानने स्वतः उत्तर दिले आहे. (armaan malik on wives)
अरमानचे युट्यूब चॅनल असून त्याच्या सर्व व्हिडीओमध्ये तो व त्याच्या दोन्ही पत्नी पायल व रितिका दिसतात. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. दोघींचे एकमेकींबरोबरचे चांगले संबंध पाहून लोक खूप हैराणदेखील झाले. आता हे तिघेही एकत्रित ‘बिग बॉस’ओटीटीमध्ये दिसणार आहेत. त्याने आता सर्वांसमोर आपल्या प्रेमाची गोष्ट सांगितली आहे.
‘बिग बॉस’ ओटीटीच्या एका एपिसोडमध्ये अनिल कपूर यांनी अरमानला एक प्रसंग दिला. अरमानने अशा एका पत्नीला किस करावे जिच्याबरोबर त्याचं खूप छान पटतं. कोणाबरोबर रात्री एकत्र वेळ घालवायला आवडतं तेव्हा त्याने पहिली पत्नी पायल मलिकची निवड केली. जेव्हा त्याला विचारले की, “हा शो कुणी जिंकावा असे वाटते?”, तेव्हा त्याने कृतिकाच्या कपाळावर किस केले. तसेच रोमॅंटिक पार्टनरबद्दल विचारले असता त्याने पायलच्या कपाळावर किस केले व म्हणाला की, “पायल कृतिकापेक्षा अधिक रोमॅंटिक आहे”.
अरमानने त्याची प्रेमकहाणीदेखील सांगितली. तो म्हणाला की, “सहा दिवसांच्या आत मी पायलच्या प्रेमात पडलो आणि सातव्या दिवशी लग्न केले”. तसेच दुसऱ्या पत्नीबद्दल म्हणाला की, “कृतिका ही पायलची मैत्रीण होती. त्यांच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या वेळी भेट झाली होती. त्यावेळी ओळख वाढली आणि प्रेम झाले. सहा दिवसांतच दोघांनी लग्न केले. लग्नाचा फोटो पायलला पाठवला. सुरुवातीला पायलने कृतिकाला स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र नंतर तिने मान्य केले”.
‘बिग बॉस’ ओटीटीचे हे पर्व अतिशय रंजक असणार आहे असाच सर्वांचा अंदाज आहे.