पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला दरवर्षी वटपौर्णिमेचा सण साजरा करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची विधिवत पूजा करुन उपवास करतात. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला ही वटपौर्णिमा साजरी केली जाते. अशातच काल संपूर्ण महाराष्ट्रात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. सामान्य महिलांसह काल अनेक अभिनेत्रींनी वडाच्या झाडाला फेऱ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
पूजा सावंत, मुग्धा वैशंपायन, योगिता चव्हाण, शिवानी सुर्वे, तितीक्षा तावडे, अमृता देशमुख अशा बऱ्याच अभिनेत्रींची यंदा पाहिली वटपौर्णिमा होती. यापैकी अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या पहिल्या वटपौर्णिमेचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे पाहायला मिळाले. अशातच नुकतेच तितीक्षानेही तिच्या पहिल्या वाटपौर्णिमेचे काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
तितीक्षाने नवरा सिद्धार्थ बोडकेबरोबरचा खास फोटो शेअर करत ‘पहिली वटपौर्णिमा’ असं म्हटलं आहे. या फोटोमध्ये तितीक्षाने लाल रंगाचा सुंदर नक्षीकाम असलेला पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. तर सिद्धार्थने मेहंदी रंगाचा शर्ट घातला असल्याचे दिसून येत आहे. तितीक्षा-सिद्धार्थच्या या फोटोला त्यांच्या अनेक चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
त्याचबरोबर तितीक्षाची बहीण खुशबू तावडेनेही तिच्या वाटपौर्णिमेचे खास फोटो शेअर केले आहेत. तितीक्षा-खुशबू या बहिणींची जोडी सशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्या दोघी सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच खुशबूने बहीण तितीक्षाच्या पहिल्या वटपौर्णिमेनिमित्त खास फोटो शेअर केला आहे.
“धाकट्या बहिणीची पहिली वटपौर्णिमा” असं म्हणत खुशबूने हे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघी बहीणींनी सारखेच ड्रेस परिधान केले आहेत. लाल रंगाचे सुंदर नक्षीकाम असलेले पंजाबी ड्रेस त्यांनी या फोटोमध्ये परिधान केले असल्याचे पहीला मिळत आहे. एका फोटोमध्ये खुशबू व तितीक्षा एकमेकींकडे बघून काही बोलताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्या दोघी नमस्कार करताना पाहायला मिळत आहे.