गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कुत्र्याने ओठाला चावलं अन्…”, ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये आलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “शस्त्रक्रिया करावी लागली आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 22, 2024 | 1:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sana Makbul Khan accident

"कुत्र्याने ओठाला चावलं अन्…", 'बिग बॉस ओटीटी'मध्ये आलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "शस्त्रक्रिया करावी लागली आणि…"

 ‘बिग बॉस’ ओटीटीचे तिसऱ्या पर्वाचा भव्य प्रीमियर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या नवीन पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते.मात्र यावेळी नवीन पर्वाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी सलमान खानकडे नसून अनिल कपूर यांच्यावर आहे. त्यांनी प्रीमियर लॉच झाल्यानंतर सहभागी सदस्यांची ओळख करुन दिली आणि त्यांच्याबरोबर बोलणेदेखील करुन दिले. ‘बिग बॉस’ ओटीटीच्या तिसऱ्या पर्वात १६ सदस्य सहभागी झाले आहेत. या शोमध्ये टेलिव्हिजन, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर,पत्रकार, खेळ, ससंगीत व साहित्य या सर्व क्षेत्रातील दिग्गज सहभागी आहेत. (Sana Makbul Khan accident)

पहिल्याच एपिसोडमध्ये सदस्यांची ओळख करुन देण्यात आली तसेच त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभवदेखील शेअर केले आहेत. अभिनेत्री सना मकबुलने एक खुलासा केला आहे. ज्यामुळे प्रत्येक जण हैराण झाला आहे. यामध्ये पहिल्या दिवशी सना व पॉलोमी दास यांच्या मते बोलणं झालं. दोघींमध्ये आरोग्यविषयक बोलणं सुरु होतं. त्यावेळी सनाच्या ओठावर एक निशाण दिसले. त्यावेळी पॉलोमीने हे काय झालं असं विचारलं.

आणखी वाचा – Video : सासरी गावातल्या मंडळींसमोर भजन गाण्यात मग्न झाली मुग्धा वैशंपायन, गायिकेच्या संस्कारांचं कौतुक, म्हणाले, “इतका साधेपणा…”

View this post on Instagram

A post shared by Sana Makbul (@divasana)

त्यावर सनाने सांगितलं की, “एका कुत्र्याने माझ्या ओठांचा चावा घेतला होता. पॉलोमीला खूप आश्चर्य वाटले आणि म्हणाली की, “तुझ्याबरोबर इतकं सगळं झालंय असा तुझा चेहरा बघून कोणीही बोलणार नाही”. त्यावर सना म्हणाली की, “माझ्या चेहऱ्यामुळे मी कमवत आहे आणि माझ्याबरोबर जो प्रसंग घडला त्यामुळे मला चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. या घटनेनंतर तिला नैराश्यदेखील आले होते”.

आणखी वाचा – “मी साफ नकारच दिला होता पण…”, ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या परीक्षणासाठी संकर्षण कऱ्हाडेचा होता नकार, म्हणाला, “परिक्षकाचा मान…”

याआधी ‘खतरो के खिलाडी’ या कार्यक्रमामध्येही तिने याबद्दलचा खुलासा केला होता. ती म्हणाली होती की, “२०२० साली लोकडाऊनमध्ये कुत्र्याने चेहऱ्याचा चावा घेतला होता. त्यामुळे स्कीन फाटली होती. यामुळे प्लॅस्टिक सर्जरी व ग्राफ्टिग अशा अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या”.

अजूनही तिच्यावर उपचार सुरु असून परिस्थिति बदलली आहे. मात्र तिच्यासाठी हा वाईट अनुभव असल्याचेही तिने सांगितले. या प्रकारानंतर तिच्या मनात प्राण्यांबद्दल भीती निर्माण झाल्याचेही ती म्हणाली.

Tags: big bossottsana makbulseason three
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Shiva serial fame Purva Phadke and Shalva Kinjawadekar shared their special bond of behind the scenes

"शिवाबरोबर मला काहीच संबंध ठेवायचा नाही आणि…", मालिकेत भांडण पण खऱ्या आयुष्यात एकमेकांशी कसे वागतात शिवा व आशू?, स्वतःच केला खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.