शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कपडे बदलताना त्याने माझं…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मालिकेत काम करण्यावरुन धक्कादायक खुलासा, म्हणाली, “धमकी दिली आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 27, 2024 | 1:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Krishna Mukherjee Share Horrific Incident

"कपडे बदलताना त्याने माझं…", सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मालिकेत काम करण्यावरुन धक्कादायक खुलासा, म्हणाली, "धमकी दिली आणि…"

‘ये है मोहब्बतें’ तसेच ‘शुभ शगुन’ मालिकेत शेहजादा धामीबरोबर स्क्रीन शेअर केलेली मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने शोच्या निर्मात्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत. ‘शुभ शगुन’चे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर अभिनेत्रीने मालिकाविश्वातून ब्रेक घेतला. काही तासांपूर्वी कृष्णाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘शुभ शगुन’च्या सेटवर तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक अनुभवाबाबत अपडेट शेअर केली. शोच्या निर्मात्याकडून होणाऱ्या छळामुळे ती नैराश्य व चिंतेने ग्रस्त असल्याचे तिने उघड केले. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये त्रासदायक गोष्टीही शेअर केल्या आहेत. तिने पोस्टमध्ये खुलासा केला आहे की, ती आजारी असताना तिला मेकअप रूममध्ये बंद करण्यात आले होते आणि पाच महिन्यांपासून तिला पगारही मिळाला नाही. यादरम्यान तिला निर्मात्याकडून धमक्याही आल्या, त्यामुळे ती बोलायला घाबरली. असे प्रकार पुन्हा घडू शकतात या भीतीने ती नवीन प्रोजेक्ट्सवर सही करणे टाळत आहे. (Krishna Mukherjee Share Horrific Incident)

कृष्णाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, “माझ्या भावना व्यक्त करण्याचे धाडस माझ्यात कधीच नव्हते, पण आज मी ठरवले आहे की यापुढे मी काहीही लपवून ठेवणार नाही. मी एका कठीण टप्प्यातून जात आहे आणि गेलं दीड वर्ष माझ्यासाठी अजिबात सोप्पं नव्हतं. मी दु:खी आहे, अस्वस्थ आहे आणि जेव्हा मी एकटी असते तेव्हा माझे मनही घाबरतं. जेव्हा मी ‘दंगल टीव्ही’साठी ‘शुभ शगुन’ हा शो करायला सुरुवात केली तेव्हापासून हे सर्व सुरु झाले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय होता”.

आणखी वाचा – सिगारेटचं व्यसन, धूम्रपान करण्याची आवड अन्…; विद्या बालनने स्वतःबद्दलच केला खुलासा, म्हणाली, “व्यसन करायला खूप आवडतं आणि…”

कृष्णा पुढे म्हणाली, “मला हा शो अजिबात करायचा नव्हता, पण मी इतरांचे ऐकून करार केला. प्रॉडक्शन हाऊस व निर्माता कुंदन सिंग यांनी मला अनेकदा त्रास दिला आहे. एकदा तर त्यांनी मला माझ्या मेकअप रूममध्ये बंद केले कारण मी आजारी होते आणि त्यावेळी मी शूट न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण ते मला माझ्या कामाची फी देत ​​नव्हते. मी आजारी होते, तरीही ते माझ्या मेकअप रूमचं दार वाजवत होते. जेव्हा मी मेकअप रुममध्ये कपडे बदलत होते, तेव्हा ते खूप जोरात दार वाजवत होते, तेव्हा असं वाटत होतं की, जणू ते दार तोडतील.

View this post on Instagram

A post shared by Krishna Mukherjee (@krishna_mukherjee786)

कृष्णा मुखर्जीने पुढे लिहिले की, “त्यांनी मला पाच महिन्यांपासून पैसे दिलेले नाहीत. ही खरोखरच खूप मोठी रक्कम आहे. मी प्रॉडक्शन हाऊस आणि दंगलच्या ऑफिसमध्ये गेले पण तिथेही मला काहीच उत्तर मिळालं नाही. तसेच अनेकवेळा त्यांनी मला धमकी दिली. मला भीती वाटली. मला असुरक्षित वाटत आहे. मी खूप लोकांकडून मदत मागितली पण त्याचं काहीच झालं नाही. त्यावर कोणीही काही करु शकत नव्हते. लोक मला विचारतात की, मी कोणताही शो का करत नाही? हे कारण आहे. मला भीती वाटते की पुन्हा तेच घडले तर? मला न्याय हवा आहे”.

आणखी वाचा – चैतन्यने अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आणलं समोर, साक्षीच्या जाळ्यात अडकत साखरपुड्यासही दिला होकार

अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे लिहिताना माझे हात अजूनही थरथरत आहेत पण मला लिहावे लागले. कारण यामुळे मी चिंता व नैराश्याशी झुंज देत आहे. आम्ही आमच्या भावना लपवतो आणि सोशल मीडियावर चांगली बाजू दाखवतो. पण हे वास्तव आहे. माझे कुटुंब मला पोस्ट करु नकोस असं सांगत होतं कारण ते सर्व अजूनही घाबरलेले आहेत. ही लोक माझं नुकसान करतील अशी भीती त्यांना आहे. पण मी का घाबरू?, हा माझा हक्क आहे आणि मला न्याय हवा आहे”.

Tags: entertainmentKrishna MukherjeeKrishna Mukherjee Share Horrific Incidenttv actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
govinda at arti singh wedding

Video : अखेर घरातील वाद संपला, भाचीच्या लग्नात गोविंदा आल्यानंतर कश्मीर शाह पाया पडली अन्…; पण अभिनेत्याची पत्नी व मुलांची गैरहजेरी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.