मंगळवार, जून 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रत्येकजण कुणाकडून तरी दुखावले गेलो”, तेजस्विनी पंडितच्या भावुक पोस्टची चर्चा, म्हणाली, “काही जखमा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 18, 2025 | 5:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tejaswini Pandit Post

"प्रत्येकजण कुणाकडून तरी दुखावले गेलो", तेजस्विनी पंडितच्या भावुक पोस्टची चर्चा, म्हणाली, "काही जखमा…"

Tejaswini Pandit Post : सिनेसृष्टीत अनेक कलाकार आहेत ज्यांचा इतर कलाकारांसह मैत्रीपूर्ण बॉण्ड पाहायला मिळाला आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या मैत्रीपूर्ण पोस्टने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. ही पोस्ट शेअर केली आहे अभिनेत्री तेजस्विनी पंडितने. तेजस्विनीने उमेश कामत, सिद्धार्थ जाधव या कलाकारांसह तसेच दिग्दर्शक संजय जाधव यांच्याबरोबरच्या मैत्रीची कहाणी या पोस्टमध्ये सांगितली आहे.येरे येरे पैसा’चा पहिला भाग २०१८ साली प्रदर्शित झाला होता. या पहिल्या भागाचे शूटिंग करताना त्यांच्यात झालेली मैत्री आजही अगदी तशीच आहे. ‘ येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट १८ जुलै रोजी म्हणजे आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानिमित्त आणि संजय जाधवच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे.

तेजस्विनीने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “२०१७ ते आत्तापर्यंत. मी, UK, दादा आणि बंडोपंत (सिद्धार्थ), आम्ही चौघेही एका क्षेत्रात काम करत होतो. एकमेकांना ओळखत होतो, पण जवळून नक्कीच नाही. ‘येरे येरे पैसा’च्या निमित्ताने एकत्र आलो आणि कायमचे एकमेकांचे झालो. कारण काही जखमा दिसत नाहीत. जखमा होण्याच्यी कारणं वेगवेगळी असली तरी, प्रत्येकजण आयुष्यात कुठेतरी किंवा कुणाकडून तरी दुखावले गेलो होतोच. हाच आमच्यातील समानतेचा धागा होता. रोज मनातली घालमेल सुरु असताना आम्ही एक कॉमेडी चित्रपट करत होतो आणि म्हणूनच आमच्या चेहऱ्यावर काही काळ का असेना, परकाया प्रवेशातून का असेना किंवा त्या नवीन मित्रांना जाणून घेण्याच्या प्रक्रियेमुळे असो. हसू उमलत होतं. जुन्या गोष्टी, जुनी दुःखं मागे पडत होती. यातच आमच्या मैत्रीची वीण घट्ट बसत गेली”.

आणखी वाचा – स्टंटमॅन राजू यांच्या मृत्यूनंतर अक्षय कुमारचा मोठा निर्णय, वैद्यकिय सुरक्षा मिळवून देण्यासाठी धडपड

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini 🕊️🧿 (@tejaswini_pandit)

तिने पुढे असं लिहिलं की, “मग सेटवर होणाऱ्या वैयक्तिक चर्चा, दादरच्या बरिस्टामध्ये, ऑर्किड हॉटेलच्या मिडनाइट बफेच्यावेळी, हाजिअलीच्या सीताफळ क्रीमचा घास घेत, तर कधी बडेमियाँसमोर उभ्या केलेल्या गाडीच्या बोनेटवर होऊ लागल्या. भेटी वाढत गेल्या. आधी काम, मग टाइमपास पासून सुरु झालेला हा प्रवास आज चुकलो तर एकमेकांचे कान धरण्यापर्यंत कधी आला कळलंच नाही. किंबहुना आठ वर्षांनी आज मागे वळून पाहताना जाणवलं, फक्त वय वाढलंय आणि शरीर थोडं (shape/size) बदललं आहे. बाकी गेल्या ८ वर्षात चित्रपटाचं नावंही बदललं नाही (YYP3) आणि आमचं भक्कम नातंही. हा, आता जखमा तेवढ्या सुगंधी झाल्यात”.

आणखी वाचा – Paaru Serial : अहिल्याने पारुला सून म्हणून स्वीकारलं?, मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश, म्हणाले, “हे फक्त स्वप्न नको”

अभिनेत्री म्हणाली की, “तर प्रेक्षकहो, आज पासून ‘येरे येरे पैसा ३’ हा आमच्या मैत्रीचा सिनेमा तुमच्या स्वाधीन करत आहोत. आमचा केंद्रबिंदू (संजय दादा) चा आज वाढदिवस आहे. त्याला आमच्या तिघांकडून प्रेम, शुभेच्छा आणि बरंच काही. अरे अभी तो पार्टी शुरु हुई है. तेवढं प्रेक्षक मित्र म्हणून तुम्ही पण पाठीवर शाबासकी द्यायला चित्रपटगृहात नक्की याल अशी आशा, अपेक्षा!”.

Tags: marathi actormarathi actresstejaswini pandit
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
kirron kher anupam kher

कॅन्सरमुळे किरण खेर यांची अशी अवस्था झाली का?, सुजलेला चेहरा, थकलेलं शरीर पाहून सारेच हैराण, व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.