बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देण्यामागे अनुपम खेर यांचाही खारीचा वाटा आहे. चित्रपटसृष्टीतील एक काळ त्यांनी गाजवला. अजूनही वयाची साठी ओलांडल्यानंतर तितक्याच मेहनतीने व जिद्दीने काम करतात. त्यांनी त्यांच्या कामामधून स्वतःला सिद्ध केलं. प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळवलं. पण खासगी आयुष्यातही त्यांना बराच संघर्ष करावा लागला. अनुपम यांनी अलिकडेच पत्नी किरण खेरबाबत भाष्य केलं होतं. किरण आई न होण्यावरुन त्यांनी सांगितलं होतं. याबाबत चर्चा सुरु असताना अनुपम व किरण यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील किरण यांचा लूक पाहून सारेच हैराण झाले आहेत. (kirron kher anupam kher)
किरण यांना २०२०मध्ये ब्लड कॅन्सर झाला होता. या गंभीर आजाराशी त्यांनी हिंमतीने दोन हात केले. दरम्यान या आजारपणाच्या काळात किरण यांच्याबरोबर अनुपम व त्यांच्या पहिल्या लग्नापासूनचा मुलगा सिकंदर सोबतच होते. कुटुंबियांची किरण यांना उत्तम साथ मिळाली. मात्र किरण यांना कॅमेऱ्यासमोर पाहिल्यानंतर त्या पुन्हा आजारी आहेत की काय? असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – स्टंटमॅन राजू यांच्या मृत्यूनंतर अक्षय कुमारचा मोठा निर्णय, वैद्यकिय सुरक्षा मिळवून देण्यासाठी धडपड
‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाच्या प्रीमियरला अनुपम व किरण यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी मिळून रेडकार्पेटवर कॅमेऱ्यासमोर विविध पोझ दिल्या. किरण यांनी यावेळी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मात्र त्यांची चपळता पूर्वीसारखी नव्हती. त्यांचा चेहराही पूर्णपणे थकलेला होता. किरण यांच्या चेहऱ्याला सूज आली होती असं चित्र दिसलं. शारीरिकदृष्ट्या किरण आता थकल्या असल्याचं चाहते सातत्याने कमेंट्सच्या माध्यमातून म्हणत आहेत. तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत.
यांना नक्की काय झालं आहे?, त्या आता ठिक आहेत आणि फिट राहण्याचा प्रयत्न करत आहेत, असं वाटत आहे की किरण अजून पूर्णपणे ठिक झाल्या नाहीत, किरण खूपच कमजोर वाटत आहेत, यांचा चेहरा का सूजला आहे? अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र यामधून एक गोष्ट कौतुकास्पद आहे. कॅमेऱ्यासमोर अनुपम किरण नीट आहेत ना?, त्यांना नीट वाटत आहे ना याची काळजी घेताना दिसत आहेत.





