सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्टंटमॅन राजू यांच्या मृत्यूनंतर अक्षय कुमारचा मोठा निर्णय, वैद्यकिय सुरक्षा मिळवून देण्यासाठी धडपड

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 18, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Akshay kumar help stunt man

स्टंटमॅन राजू यांच्या मृत्यूनंतर अक्षय कुमारचा मोठा निर्णय, वैद्यकिय सुरक्षा मिळवून देण्यासाठी धडपड

काही दिवसांपूर्वी ‘आर्या’ चित्रपटाच्या सेटवरुन धक्कादायक बातमी समोर आली. चित्रपटाचं शूट सुरु असताना स्टंटमॅन एस एम राजू यांचं निधन झालं. गाडीबरोबर सीन शूट करत असताना हा अपघात घडला. यानंतर दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीलाही मोठा धक्का बसला. स्टंटमॅनचं काम आणि त्यांच्या मेहनतीबाबत फारसं बोललं जात नाही. पण शूट करत असताना अधिक मेहनतीचं आणि काळजीपूर्वक काम करण्याची जबाबदारी स्टंटमॅनलाच पार पाडावी लागते. अशातच राजू यांच्या निधनानंतर कलाविश्वाला मोठा धक्का सहन करावा लागला. या घटनेमधूनच अक्षय कुमारने आता महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. स्टंटमॅनच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्याने घेतली आहे. (Akshay kumar help stunt man)

जवळपास ७०० स्टंटमॅन आणि स्टंटवूमनच्या विमा संरक्षणाची जबाबदारी अक्षयने घेतली आहे. स्टंटमॅनसाठी त्याने विमा योजना सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे. ७०० स्टंटमॅनला तरी याचा फायदा घेता येणार आहे. अभिनेत्याच्या या निर्णयाचं सगळ्याच स्थरातून कौतक होत आहे. ओएमजी २, अंतिम, गुंजन सक्सेना, धडक २ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे स्टंट दिग्दर्शक विक्रम सिंह दहिया यांनी याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा – २१ वर्षांनंतर जिनीलीया देशमुखचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण, राजामौलींकडून कौतुक, म्हणाले, “मी तुझी वाट…”

Stunt driver Mohan raj fatal accident at #Vettuvam shooting spot .

(Raw Unedited Footage) pic.twitter.com/D7hF85NWWY

— Prashanth Rangaswamy (@itisprashanth) July 14, 2025

विक्रम म्हणाले, “अक्षय सरांमुळे जवळपास ६५० ते ७०० स्टंटमॅन आणि एक्शन क्रु सदस्य विमा संरक्षणाच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पाच ते साडेपाच लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकिय उपचारांचा फायदा यामधून मिळणार आहे. सेट किंवा सेटच्या बाहेरही काही दुखापत झाली तरी या रकमेमधून त्यांना उपचार घेता येणार आहेत”. अक्षयने केलेलं हे काम स्टंटमॅनसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोलाचं ठरणार आहे.

आणखी वाचा – ५०शी ओलांडलेल्या मलायका अरोराने वयाच्या मर्यादा ओलांडल्या, लेकाबरोबरच्या ट्रिपदरम्यानचा बोल्डनेस प्रेक्षकांना खटकला, म्हणाले…

‘आर्या’चं शूट सुरु असताना सगळं काही सुरळीत सुरु होतं. सीन शूट करण्यामध्ये संपूर्ण युनिट व्यग्र होतं. अशातच कार पलटी झाली. सुरुवातीच्या काही सेकंदामध्ये कोणालाच काही कळालं नाही. मात्र हा अपघात मोठा होता. जागीच राजू यांना त्यांचा जीव गमवावा लागला. राजू यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजू यांच्या कुटुंबियांची जबाबदारी त्यांचा सहअभिनेता विशाल घेणार आहे. 

Tags: akshay kumarbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Tejaswini Pandit Post

"प्रत्येकजण कुणाकडून तरी दुखावले गेलो", तेजस्विनी पंडितच्या भावुक पोस्टची चर्चा, म्हणाली, "काही जखमा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.