गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Serial : अहिल्याने पारुला सून म्हणून स्वीकारलं?, मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश, म्हणाले, “हे फक्त स्वप्न नको”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 18, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Update

Paaru Serial : अहिल्याने पारुला सून म्हणून स्वीकारलं?, मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश, म्हणाले, "हे फक्त स्वप्न नको"

Paaru Serial Update : ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पारू’ ही सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पारू आणि आदित्यच्या नात्याला मान्यता मिळावी म्हणून गेले कित्येक महिने प्रेक्षक वाट पाहताना दिसले. खोट्या लग्नाच्या आठवणी, पारूचं निस्वार्थ प्रेम, आदित्यच्या मनात अपराधीपणाची जाणीव निर्माण करताना दिसली. या गोंधळात पुन्हा एकदा पारूशी खरंखुरं लग्न करण्याचा निर्णय आदित्य घेतो असं नुकतंच या मालिकेत दाखवण्यात आलं. अशातच ‘झी मराठी’ वाहिनेने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अहिल्या आणि दिशा पारूबद्दल बोलताना दिसत आहेत. आदित्य आणि पारू यांचं नातं अहिल्यादेवी स्वीकारणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

अहिल्यादेवी पारूचा सून म्हणून स्वीकार करणार का?, आदित्य-पारूच्या नात्याचं सत्य समोर येताच त्या काय बोलणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशातच समोर आलेल्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या प्रोमोमध्ये अहिल्या आणि दिशा यांचं संभाषण पाहायला मिळत असून अहिल्या पारूला सून म्हणून नक्कीच स्वीकारेल, असं ती म्हणताना दिसत आहे. कारण पारू ही आदित्यचं सुरक्षा कवच असते असं गुरुजींनी अहिल्याला सांगितलेलं असतं.

आणखी वाचा – ‘पंचायत’च्या जावयाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, हार्ट अटॅक आलाच नव्हता; स्वतःच केला खुलासा, म्हणाला…

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पारूचे अहिल्या आणि तिच्या कुटुंबावर खूप उपकार आहेत, असंही ती दिशाला सांगते. त्यामुळे पारू ही किर्लोस्करांची सून होण्यासाठी अगदी योग्य आहे असं ही अहिल्या म्हणते. तेवढ्यात दिशा पारूला भिकारडी पारू असं म्हणते आणि हे ऐकताच अहिल्या दिशाच्या सणसणीत कानाखाली लगावते. तर आता अहिल्याने अखेर पारूला सून म्हणून स्वीकारलं आहे हे समजल्यावर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी हे दिशाचं स्वप्न असल्याचं म्हटलंय.

आणखी वाचा – ५०शी ओलांडलेल्या मलायका अरोराने वयाच्या मर्यादा ओलांडल्या, लेकाबरोबरच्या ट्रिपदरम्यानचा बोल्डनेस प्रेक्षकांना खटकला, म्हणाले…

“आज थोडं बरं वाटलं मनाला नाही तर मनामध्ये एकच विचार यायचा अहिल्यादेवी पारूला सून म्हणुन स्वीकारेल का?”, “फक्त आता हे स्वप्न नको दिशाचं”, “योग्य आहे निर्णय”, “एकच नंबर”, अशा कंमेंट्स करत काही प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काहींनी हे दिशाचं स्वप्न आहे अशी कंमेंट केली आहे. तर आता खरंच अहिल्यादेवी पारूला सून म्हणून स्वीकारेल का?, हे येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Akshay kumar help stunt man

स्टंटमॅन राजू यांच्या मृत्यूनंतर अक्षय कुमारचा मोठा निर्णय, वैद्यकिय सुरक्षा मिळवून देण्यासाठी धडपड

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.