लहान पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये है मोहब्बते’ ही आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिका संपून काळ लोटला तरीही या मालिकेतील प्रत्येक पात्र ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेमुळे प्रत्येक पात्राला एक वेगळी ओळख मिळाली आहे. इशिता भल्ला, रमण भल्ला, रूही , आदित्य, शगुन या पात्रांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यातील ‘रुही’ ला प्रेक्षकांनी अधिक पसंती दर्शवली. आधी लहान रुहीच्या भूमिकेमध्ये रुहानिका धवन व मोठ्या रुहीच्या भूमिकेत आदिती भाटिया दिसून आल्या होत्या. २०१९ला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर या मालिकेतील कलाकार इतर मालिकांमध्ये दिसून आले पण मोठ्या रुहीची भूमिका साकारणारी आदिती मात्र अभिनयापासून दूर राहिली. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. (Actress aditi Bhatia new car)
आदिती अभिनयापासून दूर राहिली तरीही सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांची संवाद साधत असते. ती आपले फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने एक अपडेट दिली आहे. ज्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सध्या तिने एक नवीन कार खरेदी केली आहे. नवीन कारचा तिने व्हिडीओ शेअर केला असून ती सफेद रंगाच्या कारची पूजा करताना दिसत आहे. तसेच तिने कारबरोबर पोज देत फोटोही शेअर केला आहे.
नवीन कार खरेदी केल्यामुळे आदिती खूप खुश दिसत आहे. आदितीने नवीन कार खरेदी केली असून तिची किंमत ७५ ते ८५ लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. पण कारची नक्की किंमत काय याचा मात्र खुलासा केला नाही.
मालिकाक्षेत्रामध्ये चांगली ओळख मिळवूनदेखील आदिती अभिनयापासून दूर राहिली. सध्या ती जाहिरातक्षेत्रात अधिक कार्यरत आहे. तसेच ती सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर म्हणूनही ओळखली जाते. सोशल मीडियावर स्वतःचा फोटो शेअर करण्यासाठी ती मोठी रक्कमही घेते. आदितीने २०१५ मध्ये ‘टशन-ए-इश्क’ या मालिकेतून पदार्पण केले. त्यांतर २०१६ मध्ये तिने ‘ये है मोहब्बते’मधून रुही भल्लाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली.