बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या वागण्यामुळे सगळे पक्ष संपतील”, राजकारणात प्रवेश करण्यावरुन नाना पाटेकरांचं बेधडक वक्तव्य, म्हणाले, “अमर असल्यासारखे वागतात आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 5, 2024 | 2:34 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Nana Patekar expressed his opinion about the government's stance towards farmers

"माझ्या वागण्यामुळे सगळे पक्ष संपतील", राजकारणात प्रवेश करण्यावरुन नाना पाटेकरांचं बेधडक वक्तव्य, म्हणाले, "अमर असल्यासारखे वागतात आणि..."

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या आशयघन अभिनयामुळे जितके चर्चेत राहत असतात, तितकेच ते त्यांच्या रोखठोक भूमिकांमुळे ओळखले जातात. सरकार कोणाचंही असो, नानांनी कायमच त्यांना पटण्याऱ्या गोष्टींबद्दल आपले मत व्यकात केले आहे. गेले काही दिवस दिल्लीत शेतकऱ्यांचा मोर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांसंबंधित सुरू असलेल्या या प्रकरणात आता नानांचीही एन्ट्री झाली आहे.

नानांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारकडे काहीही मागू नका, तर कुठलं सरकार करायचं हे ठरवा, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. नाशिकमधील शेतकरी संमेलनामध्ये नानांनी सरकारच्या शेतकऱ्यांबद्दलच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Nana Patekar (@iamnanapatekar)

यावेळी नानांनी त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत असं म्हटलं की, “सरकारकडे मागू नका. कुठले सरकार करायचे हे ठरवा. मला राजकारणामध्ये जाता येत नाही, कारण माझ्या पोटात आहे तेच ओठावर येतं. दुसऱ्या दिवशी मला त्या पक्षातून काढतील. माझ्या अशा वागण्यामुळे महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असतील मग तिथे कशाला जायचं?”

आणखी वाचा – “सगळेच नशा करत असल्याचं तिने…”, इमरान हाश्मीने कंगना रणौतला चांगलंच सुनावलं, म्हणाला, “ती एवढी आक्रमक…”

यापुढे त्यांनी सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या भूमिकेबद्दल आपले मत व्यक्त करताना असं म्हटल की, “यांना (राजकारण्यांना) कधी कळणार आहे की आपण मरणार आहोत?, किती संचय करायचा?, मृत्यू अटळ आहे हे माहीत नाही का तुम्हाला?, अमर असल्यासारखे तुम्ही का वागता आणि का बोलता?, कुठले नवीन आदर्श ठेवता तुम्ही नवीन पिढीसमोर?, काय चाललं आहे? रोज आम्हाला अन्न देणारा आहे त्याची जर तुम्हाला पत्रास (कदर) नसेल तर आम्ही तुमची पत्रास या ठेवयाची?

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर जबरदस्ती, किस करण्याचा प्रयत्न अन्…; ‘त्या’ पार्टीमध्ये जॅकी श्रॉफ यांनी दारु पिऊन केला होता धिंगाणा, तेव्हा काय घडलं होतं? 

दरम्यान, नाशिक शहराजवळील मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स येथे सोमवारपासून दोन दिवसीय अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनास सुरुवात झाली. या संमेलनाचे उद्घाटक नाना पाटेकर तर, ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे हे संमेलनाध्यक्ष आहेत.

Tags: entertainment newsmarathi actormarathi entertainment newsMarathi newsnana patekarनाना पाटेकरमनोरंजन बातमीमराठी अभिनेतेमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Tejaswini Pandit will now produce a Marathi film with Hindi producers

सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितची मोठी घोषणा, आता हिंदी निर्मात्यांसह करणार मराठी चित्रपटाची निर्मिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.