गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याला दुःख होऊ शकतं कारण…”, नवऱ्याबरोबर सोशल मीडियावर फोटो पोस्ट न करण्यावरुन अमृता खानविलकरचं भाष्य, म्हणाली, “ट्रोल करणं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 3, 2024 | 5:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Khanvilkar On Husband

"त्याला दुःख होऊ शकतं कारण…", नवऱ्याबरोबर सोशल मीडियावर फोटो पोस्ट न करण्यावरुन अमृता खानविलकरचं भाष्य, म्हणाली, "ट्रोल करणं…"

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मराठीसह तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही अभिनयाची जादू दाखविली. सोशल मीडियावरही अमृता नेहमीच सक्रिय असते. नेहमीच काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अमृताच्या ग्लॅमरस लूकचे लाखो चाहते दिवाने आहेत. असं असलं तरी अमृता बरेचदा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते. बरेचदा ती या ट्रोलिंगवर भाष्य करताना ही दिसली आहे. (Amruta Khanvilkar On Husband)

अमृता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरेचदा चर्चेत राहिली आहे. हिमांशू मल्होत्रासह तिने लग्नगाठ बांधली आहे. मात्र नवऱ्याबरोबरचे फारसे फोटो ती सोशल मीडियावरुन शेअर करत नाही यावर तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. हिमांशुबरोबरचे फोटो पोस्ट करत नाही यावर अमृताने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना अमृता म्हणाली, “मला वाटते आमचे चाहते हे आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. काही लोकांना तुम्ही आवडता आणि काही लोकांना तुम्ही आवडत नाही. जोपर्यंत ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळा-ढवळ करत नाही तोपर्यंत सगळं काही ठीक असतं”.

आणखी वाचा – तुमचीही मुलं जेवत नाहीत?, अन्न समोर असेल तर खाण्यासाठी टाळाटाळ करतात का?, जाणून घ्या हे आहे त्यामागचं कारण

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

“माझं काम आणि मी इन्स्टाग्रामवर काय शेअर करते ते काहीवेळा त्यांना आवडते, पण जेव्हा ते मला आणि माझ्या कुटुंबाला किंवा हिमांशूला ट्रोल करायला लागतात ते मला आवडत नाही. त्यामुळे मी त्याच्याबद्दल खूप काही पोस्ट करत नाही. कारण मी त्याला सुरक्षित ठेवू इच्छिते. माझ्यासाठी तो बाहेर असण्यापेक्षा त्याचे रक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याचं कारण म्हणजे तो या इंडस्ट्रीतून नाही. कोणत्या प्रकारे होणाऱ्या ट्रोलिंगला आणि द्वेषासाठी तो पात्र नाही, कारण या सगळ्यामुळे त्याला दु:ख होऊ शकतं. मी नेहमीच याची काळजी घेतली, घेते आणि घेत राहीन”.

आणखी वाचा – ‘माहेरची साडी’च्या रिमेकमध्ये कोणती सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री साकारेल मुख्य भूमिका?, अलका कुबल म्हणाल्या, “सोनाली, मुक्ता, अमृता या…”

पुढे म्हणाली, “माझे व हिमांशुचे बरेच फोटो सोशल मीडियावर न टाकल्यामुळे मला ट्रोल करण्यात आले आहे. पण मी माझ्या आई- वडिलांना पाहते, जे गेल्या ४५ वर्षांपासून निरोगी, आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. त्या दोघांचे फेसबूक किंवा इन्स्टाग्रामवर एकही फोटो नाही. मला तेच करायचं आहे. मी जुन्या विचारसरणीची आहे. मी व हिमांशू एकमेकांना तेव्हा पासून ओळखतो, जेव्हा इन्स्टाग्राम नव्हतं. २००४ पासून एकमेकांना आम्ही ओळखत आहोत, तेव्हा आम्ही कॅमेऱ्यात फोटो काढायचो. आम्हाला एकमेकांना सुरक्षित ठेवायचं आहे आणि एकमेकांची ओळख जपायची आहे”. एक प्रादेशिक अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीमध्ये प्रतिनिधित्वाची कमतरता जाणवली की नाही याबद्दलही अमृताने खुलासा केला आणि म्हणाली, “सर्व रेषा किंवा क्षेत्र अस्पष्ट आहेत. आज अनेक प्रादेशिक अभिनेते, अभिनेत्री व दिग्दर्शक इतके चांगले काम करत आहेत. टॅलेंटनुसार तुम्ही कोणती दिशा निवडता याला अधिक महत्त्व आहे”.

Tags: amruta khanvilkaramruta khanvilkar himashu malhotraAmruta Khanvilkar On Husbandmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Marriage will not happened for saying this phrases see the details

Video : लग्नापूर्वी घरात सतत ही वाक्य कधीच बोलू नका, घटस्फोटापर्यंत पोहचू शकतं प्रकरण, पाहा ज्योतिषशास्त्र काय सांगतात?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.