Tharala Tar Mag Janmashtami special : सध्या सर्वत्र दहीहंडीची जोरदार तयारी सुरु असलेली पाहायला मिळते. महाराष्ट्रात दहीहंडी हा सण अगदी जल्लोषात साजरा केला जातो. एकावर एक थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक प्रयत्न करताना दिसतात. दहीहंडी पाहण्यासाठी ही प्रेक्षकांची तुफान गर्दी असते. अशातच सध्या मालिका विश्वातही दहीहंडीची जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक मालिकांच्या सेटवर दहीहंडीचा हा खास सोहळा साजरा केला जातो. अशातच मालिका विश्वातील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’च्या सेटवरील दहीहंडी उत्सव अगदी जल्लोषात साजरा केलेला पाहायला मिळत आहे.
ठरलं तर मगच्या सेटवर अगदी दणक्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. ‘ठरलं तर मग’च्या अन्नपूर्ण निवासला ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे मालिकेत लक्ष्मीच्या पाउलांनी, थोडं तुझं थोडं माझं, ठरलं तर मग या तीन मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे. आणि ठरलं तर मगच्या कलाकारांकडून मालिकेत खास कार्यक्रम आयोजित केला आहे. यांत दहीहंडी उत्सवाच्या आधीच अर्जुन सायलीचा “मी किसन तुझा, तू माझी राधा’ या गाण्यावरचा डान्स मोहित करणारा आहे.
आणखी वाचा – “On duty पोलिसांच्या गाड्यांची ही अवस्था…”, शशांक केतकरने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला, “गंजलेली नंबरप्लेट…”
याशिवाय ‘ठरलं तर मग’च्या सायलीचाही दहीहंडी फोडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओवरुन आता मालिकेतील मुख्य पात्र म्हणजे सायली यंदाची ही मनाची दहीहंडी फोडणार का याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. महिला गोविंदा पथकाच्या मदतीने थरावर थर रचत सायली दहीहंडीसाठी सज्ज आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच तिचं तोंडभरुन कौतुक करत आहेत. तर व्हिडीओमध्ये सायलीला दहीहंडी फोडताना तिचे सहकलाकार प्रोत्साहन करत आहेत.
या मालिकेतील सायली हे पात्र प्रेक्षकांचं आवडत पात्र आहे. मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, सध्या मालिकेत अर्जुनने मधुभाऊंची केस जिंकली असून त्यांची त्याने जेलमधून सुटका केली आहे. तर साक्षी आणि प्रियाला पोलिसांनी अटक केलं आहे. इतकंच नाही तर मधुभाऊंनाही सायलीच खरी तन्वी असल्याचं संशय आला आहे पण हाती ठोस पुरावा येण्याकडे ते वाट पाहत आहेत.





