Shilpa Shirodkar car accident : सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरबाबत खूप मोठी अपडेट समोर आली आहे. शिल्पा शिरोडकरच्या गाडीचा अपघात झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली. याबाबत अभिनेत्रीने स्वतः माहिती दिली आहे. सोशल मीडियावर थेट स्टोरी पोस्ट करत तिने याबाबतची माहिती दिली.अपघातानंतर पोस्टद्वारे अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. सिटीफ्लो बसची धडक अभिनेत्रीच्या गाडीला लागली आणि अभिनेत्रीच्या गाडीचा मोठा अपघात झाला. ठाण्यातील नामांकित कंपनीच्या बसने धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचं समोर आलं.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर या अपघाताची बातमी चाहत्यांना दिली आहे. इतकंच नाहीतर या अपघातात अभिनेत्री सुखरूप असल्याचंही समजलं आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “आज सिटीफ्लोची एक (Cityflo) बस माझ्या गाडीला धडकली आणि त्यांच्या मुंबईतील ऑफिसचे प्रतिनिधी योगेश कदम आणि विलास मांकोटे सांगत आहेत की ही त्यांच्या कंपनीची जबाबदारी नाही, ती चालकाची जबाबदारी आहे. किती निर्दयी लोक आहेत हे. चालकाला असा किती पगार असेल”.

अभिनेत्रीने यावेळी मुंबई पोलिसांचे आभार मानत पुढे म्हटलं की, “धन्यवाद मुंबई पोलिस. तुम्ही मला यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात सहाय्य केलं. पण, त्या कंपनीने ही जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. सिटीफ्लो, तुम्ही जर या प्रकरणासंदर्भात माझ्याशी संपर्क साधला तर त्याचं मी कौतुक करेन. सुदैवानं माझ्या स्टाफमधील कोणालाही दुखापत झाली नाही, पण काहीही होऊ शकलं असतं.”
आणखी वाचा – “On duty पोलिसांच्या गाड्यांची ही अवस्था…”, शशांक केतकरने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला, “गंजलेली नंबरप्लेट…”
घडलेल्या प्रकरणात अभिनेत्रीला दुखापत झाली नसून ती सुखरुप आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये बस आणि बसचा नंबर स्पष्ट दिसत आहे. शिवाय अभिनेत्रीच्या गाडीला धडक दिल्याने तिच्या गाडीच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत. समोर आलेल्या फोटोंमधून अभिनेत्रीच्या गाडीचं मोठं नुकसान झालं असल्याचं दिसत आहे.





