सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पारू’चं स्वप्न अहिल्यादेवी पूर्ण करणार?, मालिकेत मोठा TWIST! पारू-आदित्यला अहिल्यादेवींची साथ

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 16, 2025 | 3:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ahilyadevi Helps Paaru-Aditya

पारू-आदित्यला अहिल्यादेवींची साथ

Ahilyadevi Helps Paaru-Aditya : ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसतात. त्यातही ‘पारू’ या मालिकेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेतील पारू आणि आदित्य या जोडीला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळताना दिसत आहे. सध्या या मालिकेत एक अतिशय महत्त्वाचं आणि भावनिक वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. तर सध्या मालिकेत श्रीकांतच्या काही अटींमुळे पारू आणि आदित्य पुन्हा किर्लोस्कर घरात परतताना दिसतात. त्यामुळे आदित्य आणि पारूच्या आयुष्यातील प्रवासाला नव्याने सुरुवात होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आता ही मालिका आणखी एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीने नुकताच या मालिकेचा एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पारूच्या टिफीन सर्व्हिस या छोट्याशा व्यवसायाला पुढे नेण्याचं तिचं स्वप्न दाखवण्यात आलं आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदित्यला एक मोठा ऑर्डर पूर्ण करयचा असतो. मात्र ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्याला अहिल्यादेवीची मदत लागते. त्यामुळे आदित्य किर्लोस्कर घरात जाऊन अहिल्यादेवीसमोर मदतीचा हात मागतो. पण प्रोमोमध्ये पुढे दाखवण्यात आलं आहे की, अहिल्यादेवी आदित्यला मदत करण्यास स्पष्ट नकार देते. इतकंच नाही, तर दिशा देखील अहिल्यादेवीला आदित्यविरोधात चढवताना दिसते. त्यामुळे अहिल्यादेवी आणखी संतापते आणि आदित्यला मदत न करण्याचा ठाम निर्णय घेते.

आणखी वाचा – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या अब्दुलचे मुंबईत दोन रेस्टॉरंट, एकेकाळी कमाई होती फक्त ५० रुपये, नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

यानंतर प्रोमोमध्ये एक भावनिक क्षण पाहायला मिळतो, जिथे आदित्य निराश आणि भावुक होतो. “आता ही ऑर्डर कॅन्सल करावी लागेल… पारूचं स्वप्न मी पूर्ण करू शकणार नाही” असं म्हणत तो भावुक होताना दिसतो. मात्र याच क्षणी कथेत नवा ट्विस्ट येताना पाहायला मिळतो. अहिल्यादेवी अचानक आदित्यसमोर येते आणि ऑर्डर कॅन्सल करण्याची काहीच गरज नसल्याचं सांगते. त्यामुळे आता पुढे अहिल्यादेवी खरंच आदित्यला मदत करणार का? अहिल्यादेवीच्या मदतीमुळे आदित्य पारूचं स्वप्न पूर्ण करू शकेल का? की अजून काही नवे ट्विस्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत? या सर्व ट्विस्टमुळे ‘पारू’ मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून पुढील भागांसाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायिका झाली आई, लग्नाच्या तीन वर्षांनी दिली गुडन्यूज, गोंडस मुलाला दिला जन्म

Tags: Ahilyadevi Helps Paaru-Adityaentertainmentmarathi malikamarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Next Post
Sunny Deol Emotional

VIDEO : 'बॉर्डर २'च्या टीझर लाँचवेळी सनी देओल भावुक, वडिलांच्या आठवणीत डोळ्यांत पाणी, उपस्थितांनी दिला धीर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.