शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या अब्दुलचे मुंबईत दोन रेस्टॉरंट, एकेकाळी कमाई होती फक्त ५० रुपये, नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 16, 2025 | 12:19 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
taarak mehta ka ooltah chashmah abdul

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या अब्दुलचे मुंबईत दोन रेस्टॉरंट, एकेकाळी कमाई होती फक्त ५० रुपये, नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क

taarak mehta ka ooltah chashmah abdul : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १८ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आणि त्यातील प्रत्येक पात्र घराघरात प्रसिद्ध झाले. मग ती दयाबेन असो, जेठालाल असो, मिस्टर भिडे असो वा पोपटलाल असो… प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे आणि त्यांचे फॅन फॉलोइंगही तितक्याच तिपटीने आहे. या मालिकेतील अशीच एक व्यक्तिरेखा जिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले तो म्हणजे अब्दुल. अब्दुल ही भूमिका अभिनेता शरद सांकला याने साकारली आहे. ‘तारक मेहता…’ २००८ साली सुरु झाला आणि तेव्हापासून शरद सांकला त्यात अब्दुलची भूमिका करत आहे. मात्र, त्यापूर्वी शरद सांकला हे सात वर्षांपासून बेरोजगार होते. त्यांच्याकडे काही काम नव्हते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शरद सांकला यांनी त्यांच्या संघर्षाचे दिवस आठवले.

शरद सांकला यांनीही बॉलिवूडमध्ये काम केल्याची माहिती आहे. काही चित्रपटांमध्ये ते छोट्या भूमिकांमध्ये दिसले. शाहरुख खान स्टारर ‘बादशाह’ आणि ‘बाजीगर’ व्यतिरिक्त ते ‘हम हैं राही प्यार के’, ‘हम आपके दिल में रहते हैं’ आणि ‘साजन चले ससुराल’मध्येही दिसले होते. पण एक काळ असा होता की शरद संकला यांच्याकडे काम नव्हते आणि ते सात वर्षे निष्क्रिय बसले होते. पण नंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आला आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं.

आणखी वाचा – “तुला बॉयफ्रेंडची गरज आहे”, फराह खानचा वयाच्या ६१ व्या वर्षी कुनिका सदानंदला भलताच सल्ला, म्हणाली, “स्वतःचे निर्णय…”

आज शरद संकला हे प्रत्येक घराघरात ओळखले जातात आणि शोमधूनही त्यांची चांगली कमाई होत आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘तारक मेहता’मधील एका एपिसोडसाठी त्यांना ३५-४० हजार रुपये फी मिळते. याशिवाय त्यांचे मुंबईत दोन रेस्टॉरंट आहेत, ज्यातून त्यांची चांगली कमाई आहे. ‘बॉलीवूड टॉक’नुसार, शरद संकला यांचे जुहूमध्ये एक रेस्टॉरंट असून त्याचे नाव ‘पार्ले पॉइंट’ आहे आणि दुसरे अंधेरी येथे आहे, ज्याचे नाव ‘चार्ली कबाब’ आहे. वृत्तानुसार, शरद सांकला यांची एकूण संपत्ती चार ते सहा कोटी रुपये आहे.

View this post on Instagram

A post shared by Sharad Sankla Official (@officialsharadsankla19)

एका मुलाखतीत शरद सांकला यांनी सांगितले होते की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ किती काळ चालेल हे त्यांना माहिती नाही आणि त्यांच्याकडे फक्त हाच शो आहे, म्हणून त्यांनी कुटुंबाला मदत करण्यासाठी रेस्टॉरंट व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. पत्नीशिवाय त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शरद सांकला यांच्या पत्नीचे नाव प्रेमिला सांकला आहे. मुलीचे नाव कृतिका आणि मुलाचे नाव मानव आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायिका झाली आई, लग्नाच्या तीन वर्षांनी दिली गुडन्यूज, गोंडस मुलाला दिला जन्म

शरद सांकला यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी १९९० मध्ये ‘वंश’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यात त्यांची एक छोटी भूमिका होती, ज्यासाठी त्यांना फक्त ५० रुपये मानधन मिळाले होते. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी ३५ हून अधिक चित्रपट केले आहेत, मात्र ते फक्त छोट्या भूमिकांमध्येच दिसले. (अस्वीकरण: शरद सांकला यांचे मानधन आणि नेटवर्थ यासंबंधीचे आकडे मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे दिले आहेत)

Tags: abdulentertainmentTaarak Mehta Ka Ooltah Chashmah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Anushka sharma virat kohli

भारतात येताच विराट कोहली बायकोसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी, अनुष्का शर्मा भावुक झाली अन्…; संस्कारांचं कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.