Sayli Kamble Welcomes Baby Boy : मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील असे बरेच कलाकार आहेत जे आई-बाबा झाले आहेत. अनेकांनी त्यांच्या चाहत्यांसह आई-बाबा झाल्याची गुडन्यूज शेअर केली. अशातच बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील लाडकी गायिका आई झाली असल्याचं समोर आलं आहे. ‘इंडियन आयडल’ फेम गायिका सायली कांबळे आई झाली आहे. सायलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. लग्नाच्या तीन वर्षांनी तिने आई झाल्याची गोड बातमी दिली.
सायलीच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं असून तिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सायली कांबळेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ‘एक छोटासा चमत्कार, आयुष्यभराचे प्रेम…. आम्हाला मुलगा झाला आहे. तुमच्या सर्व प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद,” असं कॅप्शन देत गोड बातमी सायलीने दिली आहे. सायली कांबळेला १२ डिसेंबर २०२५ रोजी मुलगा झाला. सायली व तिचा पती धवलने लग्नाच्या तीन वर्षांनी बाळाचे स्वागत केले आहे.
आणखी वाचा – रॉडने हल्ला, रक्तस्त्राव आणि…; लोकप्रिय अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला, सोसायटीतील रहिवाशाकडून मारहाण
सायलीने ही आनंदाची बातमी देताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळी तसेच चाहत्यांनीही तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सायली कांबळे ‘इंडियन आयडल १२’ या सीझनमधून घराघरात पोहोचली. आपल्या सुमधुर आवाजामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. सायली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
सायली कांबळेने बॉयफ्रेंड धवलसह २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांनी अगदी थाटामाटात लग्न केले. लग्नाच्या तीन वर्षानंतर ते आई-बाबा झाले आहेत. थेट इंस्टाग्रामला सायलीने डोहाळ जेवणाचा फोटो शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. या डोहाळ जेवणाच्या फोटोमध्ये सायली तिचा पती धवलसह दिसली, यावेळी दोघेही एकमेकांकडे पाहत प्रेम व्यक्त करताना दिसले.





