बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“…म्हणून मी लग्न केलं”, अभिजीत खांडेकरच्या बायकोचं नात्याबाबत पहिल्यांदाच खुलेपणाने भाष्य, म्हणाली, “लग्नानंतर प्रेम…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 31, 2023 | 3:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhijeet Khandkekar And Sukhada Khandkekar

"…म्हणून मी लग्न केलं", अभिजीत खांडेकरच्या बायकोचं नात्याबाबत पहिल्यांदाच खुलेपणाने भाष्य, म्हणाली, "लग्नानंतर प्रेम…"

मराठी सिनेसृष्टीतील एक लाडकं कपल म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर. या दोघांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. अभिजीतने आजवर त्याच्या अभिनयाने तर सुखदाने तिच्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही जोडी साऱ्या प्रेक्षकांना विशेष आवडते. सोशल मीडियावरून नेहमीच ते काही ना काही पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. कामाच्या व्यस्त शेड्युलमधून ते एकमेकांना वेळ देताना दिसतात. अशातच दोघांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाबद्दल आणि एकमेकांच्या सवयीबद्दल भाष्य केलं आहे. (Abhijeet Khandkekar And Sukhada Khandkekar)

अभिजितबरोबर लग्न करताना सुखदाच्या मनात नेमका कोणता विचार होता याबाबत द क्राफ्ट’ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने भाष्य केलं आहे, याबाबत बोलताना सुखदा म्हणाली, “माझ्यासाठी लग्न म्हणजे काय? मला अभिसोबत कायमच असं जाणवलं की, एखाद्या बरोबर आपण असतो तेव्हा आयुष्य सोपं वाटतं. छोट्या गोष्टींमध्ये आनंद सापडतो. खूप मोठे माईल स्टोन्स पार करायला जाऊ नका. तर रोजच्या आयुष्यात आज मला सुट्टी आहे, तुला सुट्टी आहे, बसून एक छान फिल्म पाहूया. हे सोपं जे आहे ना ते मिस होतं अनेकदा. तुम्ही जेव्हा अनेकदा विचार करता माझ्या करिअरला सपोर्ट करणारा नवरा मला हवा आहे, अर्थात खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यावेळी करिअरला सपोर्ट करणारा म्हणजे नेमकं काय हे आधी समजून घ्या”

आणखी वाचा – “झोपून घे बाई…”, सई लोकूरच्या व्हिडीओवर क्रांती रेडकरची कमेंट, म्हणाली, “तुला व तुझ्या येणाऱ्या बाळाला…”

यापुढे स्वभावाबाबत बोलताना सुखदा म्हणाली, “मला सगळ्यात पहिली अभिच्या बाबतीत जाणवली ती सहजता. तुम्ही वाटेल त्या विषयावर एकमेकांशी बोलू शकता त्या विषयावर बोलू शकता एकमेकांशी. आज दहा वर्ष झाली लग्नाला तरी आजही मला वाटतं की, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद जसा अभि शोधतो. ते मला जमलं पाहिजे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्यात अभि माहीर आहे.””

View this post on Instagram

A post shared by Sukhada Khandkekar (@morpankh)

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची मराठी मालिकेत एन्ट्री, वेगळ्या अंदाजात दिसणार अभिनेत्री, प्रोमो समोर

लग्नाबाबत बोलताना सुखदा पुढे असं म्हणाली, “मी लग्नाला तयार झाले होते ते एका विचारावर की माझ्या जिवलग मित्राबरोबर मला आयुष्य घालवायला मिळेल. लग्नानंतर मग प्रेम, नवरा वगैरे येतं. पण माझ्या मित्राबरोबर आयुष्य घालवायचं मी ठरवलं होतं. आणि मी खूप आनंदी आहे.’ तेव्हा करिअरला सपोर्ट करणारा म्हणजे नक्की काय? हे कळायला हवं.”

Tags: abhijeet khandkekarentertainmentlovestorymarathi actormarathi actressmarathi couplemarathi serialsukhada khandkekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "स्विमिंग पूलमध्ये मस्ती, हातावर किस अन्…", अभिषेक कुमार व खानजादीमध्ये जवळीक, ईशा मालवीयचा जळफळाट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.