रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “स्विमिंग पूलमध्ये मस्ती, हातावर किस अन्…”, अभिषेक कुमार व खानजादीमध्ये जवळीक, ईशा मालवीयचा जळफळाट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 31, 2023 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "स्विमिंग पूलमध्ये मस्ती, हातावर किस अन्…", अभिषेक कुमार व खानजादीमध्ये जवळीक, ईशा मालवीयचा जळफळाट

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चं पर्व सध्या विशेष गाजतंय. सततची भांडण, मारामाऱ्या, रोमॅंटिक क्षण या सगळ्याचे वेगवेगळे अनुभव यंदाच्या ‘बिग बॉस’मध्ये येत आहेत. अभिनेता अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांनी ‘बिग बॉस १७’ मध्ये प्रवेश केला तेव्हापासून दोघांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय ‘बिग बॉस’च्या घरात येण्याआधी रिलेशनशिपमध्ये होते, मात्र त्यांचं हे नातं जास्त काळ टिकलं नाही आणि ते वेगळे झाले. दरम्यान, ईशाने अभिषेकवर अनेक गंभीर आरोप केले होते.

अभिषेक व ईशा या शोमध्ये जेव्हा एकमेकांसमोर आले तेव्हा सलमान खानसमोर त्यांनी जोरदार भांडण ही केले. अभिषेकला तिचा एक्स बॉयफ्रेंड म्हणून स्वीकारण्यासही ईशाने स्पष्ट नकार दिला होता. ती फक्त अभिषेकची मैत्रीण असल्याचे ईशाने सांगितले. मात्र, त्यानंतर ‘बिग बॉस’च्या घरातच तिने अभिषेक बरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबूल केलं.

आणखी वाचा – “…म्हणून मी लग्न केलं”, अभिजीत खांडेकरच्या बायकोचं नात्याबाबत पहिल्यांदाच खुलेपणाने भाष्य, म्हणाली, “लग्नानंतर प्रेम…”

‘बिग बॉस’च्या घरात समर्थची एंट्री झालेली पाहायला मिळते. जो ईशाचा सध्याचा प्रियकर आहे. समर्थ ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर अभिषेकची अवस्था दयनीय झाली. तो टीव्हीवर मोठ्याने ओरडला. अभिषेकला ईशापासून दूर राहणे शक्य नव्हते. मात्र तरी त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं. त्यानंतरच्या भागात ईशाच्या दोन्ही बॉयफ्रेंडमध्ये जोरदार वाद झाला होता.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – सोनाली कुलकर्णी यांचे आई-वडील मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

आता या शोमध्ये आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अभिषेक कुमारचं नवं रूप पाहायला मिळतंय. खरंतर सध्या अभिषेक खानझादीबरोबर बराच वेळ घालवत आहे. अशातच अभिषेक आणि खानजादीचा नवा प्रोमो समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक खानजादीसह मस्ती करताना दिसत आहे. ते दोघे स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर दोघेही बागेच्या परिसरात एकत्र झोपून बोलतांना दिसले. येथे खानजादीने अभिषेकला मला ‘अहो जावो’ करू नको असे सांगितले. यानंतर खानजादी म्हणाली की, ती अभिषेकला शहजादा म्हणू शकते. यादरम्यान त्याने खानजादीच्या हातावर चुंबन घेतले असल्याचंही पाहायला मिळालं.

Tags: Abhishek kumarbigg bossbiggboss 17entertainmentkhanzaadi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Imran Khan spotted with Lekha Washington

थाटामाटात लग्न, आठ वर्षांनी घटस्फोट अन्…; इमरान खान आता विवाहित अभिनेत्रीला करतोय डेट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.