शुक्रवार, सप्टेंबर 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्रीला अश्लील मॅसेज करणारा ‘तो’ मराठी अभिनेता नक्की कोण?, ‘सेक्सी’ म्हणूनही डिवचलं अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 27, 2025 | 1:38 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Who is sudesh mhashilkar messaged prachi pisat

सुप्रसिद्ध अभिनेत्रीला अश्लील मॅसेज करणारा ‘तो’ मराठी अभिनेता नक्की कोण?

इंडस्ट्रीत महिलांबरोबर घडणारे विचित्र प्रकार आणि त्याबाबत स्पष्ट बोलणं टाळलं जातं. अभिनेत्रीच पुढे येऊन घडणाऱ्या वाईट घटनांबाबत भाष्य करत नाहीत. दोन पावलं मागेच सरकतात. मात्र सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने धाडसी पाऊल उचलत मराठी अभिनेत्याचं घाणेरडं कृत्य सगळ्यांसमोर आणलं. अभिनेत्री प्राची पिसाटला मराठीमधील दिग्गज अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी मॅसेज केले. या मॅसेजमध्ये “तुझा नंबर दे, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा आहे, तू हल्ली खूप सेक्सी दिसायला लागली आहेस” असं म्हटलं. प्राचीला राग अनावर झाला तिने थेट स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्याचा काळा चेहरा सगळ्यांसमोर आणला. इंडस्ट्रीतीलच अभिनेत्रीबरोबर असं अश्लील कृत्य करणारे सुदेश नक्की कोण? हे सविस्तर जाणून घेऊया. (Who is actor sudesh mhanshilkar)

सुदेश म्हशीलकर नक्की कोण?

प्राचीने सोशल मीडियावर सुदेश यांनी केलेल्या मॅसेजचे स्क्रिनशॉट शेअर केले. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं. प्राचीनेही सुदेश यांना उत्तर देत खडेबोल सुनावले. तसंच कलाक्षेत्रातील इतर अभिनेत्रींनी तिला पाठिंबा दिला. आता बोलायलाच हवं म्हणत प्राचीचं अभिनेत्रींनी कौतुक केलं. सुदेश आजही कलाक्षेत्रात उत्तमोत्तम भूमिका साकारतात. ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली.

आणखी वाचा – मराठी अभिनेत्रीला दिग्गज अभिनेत्याचे अश्लील मॅसेज, अभिनेत्रींनी दिला पाठिंबा, म्हणाल्या, “अभिनेत्री सहज उपलब्ध आहेत असं…”

View this post on Instagram

A post shared by Prachi Pisat (@prachipisat11.11)

मराठी मालिकांमध्येही काम

त्याचबरोबरीने स्टार प्रवाह वाहिनीवरील नवी मालिका ‘कोण होतीस तू काय झालीस तू’मध्ये ते श्रीकांत धर्माधिकारी ही भूमिका साकारत आहेत. याआधीही त्यांनी मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांचं कामही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस आलं. मात्र सगळं काही सुरळीत सुरु असताना सुदेश यांना अशाप्रकारची दुर्बुद्धी का सुचली?, त्यांनी प्राचीला अश्लील मॅसेज का केले? हा प्रश्नच आहे. खरं तर प्राचीने हा प्रकार सगळ्यांसमोर आणला त्याचं विशेष कौतुक. बहुदा कोणीही यापुढे इंडस्ट्रीतील अभिनेत्रींना वागणूक देताना विचार करतील.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा – सात महिन्याची गरोदर, खांबाला बांधून जाळलं अन्…; सासू-नवऱ्याने हुंड्यासाठी विकली माणूसकी, बाळाला जन्मापूर्वीच…

प्राचीने पोस्ट केल्यानंतरही अनेकांनी तिलाच ज्ञान सांगितलं. सुदेश यांचं  अकाऊंट हॅक झालं आहे का? असं तिलाच सांगितलं. पण सुदेश यांनीच मॅसेज केला असल्याचं प्राचीने उघड केलं. सुदेश यांनी अनेकांना उघडपणे प्राचीला मॅसेज केला असल्याचं सांगितलं. आता सुदेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सगळ्याच पोस्ट काढल्या आहेत. तसेच प्राचीने मॅसेज केल्याचा दावा करुनही संपूर्ण प्रकारावर बोलणं टाळलं आहे. सुदेश यापुढे प्राचीला केलेल्या मॅसेजवर स्पष्टीकरण देणार का? हे पाहावं लागेल.

Tags: entertainment newsmarathi actormarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Vaishnavi Hagawane Death Case

२९ जखमा, पाच-सहा वार ताजेच अन्…; वैष्णवी हगवणे प्रकरणातील मोठी माहिती, शेवटच्या श्वासापर्यंत वार आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.