शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे घालावे?, पण चुकूनही ‘या’ रंगाचे कपडे घालून घराबाहेर पडू नका कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 7, 2024 | 5:38 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Mahashivratri 2024

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे घालावे?, पण चुकूनही 'या' रंगाचे कपडे घालून घराबाहेर पडू नका कारण...

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने शिव मंदिरात मोठी सजावट, रोषणाई केली जाते. अनेकजण घरी किंवा मंदिरात रुद्राभिषेक वा शिव उपासना करतात. या दिवशी भगवान शिव व माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीची सर्व संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे. यंदा ८ मार्च २०२४ रोजी देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. (Mahashivratri 2024)

महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेच्या वेळी परिधान केलेल्या कपड्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? कोणत्या रंगाचे कपडे टाळावेत? कपडे कसे असावेत? या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी महाशिवरात्रीच्या रंगांचे महत्त्व सांगितले आहे.

आणखी वाचा – Video : अशोक सराफ यांना पुरस्कार स्वीकारताना पाहून बायको भावुक, निवेदिता सराफांनी शेअर केला व्हिडीओ, म्हणाल्या, “आम्ही दोघंही…”

महाशिवरात्रीच्या पवित्र सणाला पूजा करण्यासाठी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत. भगवान शंकराला हिरवा रंग खूप आवडतो. त्यामुळे यादिवशी शक्यतो हिरवा रंग परिधान करावा. जर तुम्ही या दिवशी हिरवे कपडे परिधान केले तर ते तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाते. याशिवाय महाशिवरात्रीच्या पूजेदरम्यान तुम्ही लाल, पिवळे, गुलाबी, केशरी वा पांढऱ्या रंगाचे कपडेही परिधान करु शकता. या रंगाचे कपडे परिधान करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकतं.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील सोनूने कायमचीच सोडली इंडस्ट्री, प्रसिद्धीकडे पाठ फिरवत आता करते ‘हा’ व्यवसाय, एकूण कमाई आहे…

महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना भगवान शंकरासमोर काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. याशिवाय या दिवशी निळ्या रंगाचे कपडे घालण्यास मनाई आहे. या रंगाचे कपडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, जे तुमच्या पूजेमध्ये अडथळा आणू शकतात. केवळ महाशिवरात्रीच्या दिवशीच नव्हे तर कोणत्याही धार्मिक विधी किंवा पूजेच्या वेळी भारतीय संस्कृतीनुसार हिंदू धर्मात पुरुषांनी धोतर-कुर्ता आणि महिलांनी साडी नेसली पाहिजे. तुमचा ड्रेस सुती कापडाचा असावा याची विशेष काळजी घ्यावी.

Tags: entertainmentlord shivamahashivratriMahashivratri 2024
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Tejaswini Pandit shared her struggle story see the details

कर्जाचा डोंगर, घरात लाईटही नाही, लोकांच्या वाईट नजरा अन्…; तेजस्विनी पंडितलाही चुकला नाही 'वनवास', सांगितलेलं सत्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.