बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जॉनी लिवरने मंत्र म्हणताच ऋतिक रोशनला झालेला आजार पूर्णपणे झाला दूर, राकेश रोशनही झाले होते हैराण, तेव्हा काय चमत्कार घडला?

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 4, 2024 | 6:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Johnny lever on Hrithik roshan

जॉनी लिवरने मंत्र म्हणताच ऋतिक रोशनला झालेला आजार पूर्णपणे झाला दूर, राकेश रोशनही झाले होते हैराण, तेव्हा काय चमत्कार घडला?

बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता म्हणून जॉनी लिव्हरचे नाव घेतलं जातं. आजही जॉनी आपल्या अभिनयाने  प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. विविध चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकतच त्यांनी अभिनेता हृतिक रोशनबद्दल केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. हृतिकने 50व्या वर्षीही स्वतःला मेंटेन ठेवले आहे. त्याने 2000 साली चित्रपटसृष्टीमध्ये ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून अभिनेत्री अमीषा पटेलबरोबर पदार्पण केलं. हा चित्रपट प्रचंड चालला. या चित्रपटामध्ये फरीदा जलाल, अनुपम खेर, मोहनिश बहल यांच्याबरोबर जॉनी लिव्हर यांनीही प्रमुख भूमिका केली होती. पण या चित्रपटादरम्यान हृतिक रोशन आजारी पडला होता. तेव्हा त्याच्यावर कसे उपाचर केले?, हृतिक कसा बरा झाला? याबद्दल जॉनी यांनी वक्तव्य केले. (Johnny lever on Hrithik roshan)

हृतिकने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून पदर्पण केले होते. 10 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या चित्रपटाने तब्बल 80 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या इव्हेंटसाठी सर्व जण नाशिक येथे गेले होते. तेव्हा एक किस्सा घडला तो जॉनी यांनी ऐकवला.

आणखी वाचा – Video : दीपिका पदुकोणनंतर कतरिना कैफही देणार गुडन्यूज?, अंबानींच्या पार्टीमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

त्यांनी सांगितले की, “हृतिकचा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी आम्ही सर्व एका इव्हेंटसाठी नाशिक येथे गेलो होतो. हृतिक चित्रपटामुळे खूप प्रसिद्ध झाला होता. पण जेव्हा आम्ही विमानातून उतरलो तेव्हा राकेश रोशन मला निराश वाटले. मी त्यांना विचारले काय झालं म्हणून ? तेव्हा त्यांनी सांगितले की हृतिकची समस्या आहे”.

आणखी वाचा – Video : अंबानी कुटुंबियांनी शाहरुख खानलाही जय श्रीराम बोलण्यास भाग पाडलं, स्टेजवरुनच जोरदार घोषणा केली अन्…; Inside Video व्हायरल

त्यावर जॉनी यांनी विचारले की, “काय समस्या आहे? तेव्हा राकेश यांनी सांगितले की लहानपणापासूनच हृतिकच्या यकृताला सूज आहे. त्यामुळे त्याची तब्येत बनत नाही. असाच बारीक आहे. खूप साऱ्या गोळ्या खातो पण काहीही फायदा होत नाही. तेव्हा राकेशने मला लगेच आठवण करून दिली की ‘कोयला’ चित्रपटाच्या वेळी जीजसचं नाव घेऊन काहीतरी केलं होतस तसं काही करू शकतोस का?”, त्यावर मी म्हणालो की, “मी करेन. तो माझ्या मुलासारखाच आहे. मी त्याला बोलावलं आणि जीजसचं नाव घेऊन म्हंटलं जा. राकेशचा माझ्यावर विश्वास होता. जे काही करतो ते देव करतो. पण माझा फक्त हात लागतो. तो दिवस आणि आजचा दिवस यामध्ये हृतिकने कोणत्याही गोळ्या खाल्ल्या नाहीत”, असं जॉनी यांनी सांगितलं.

जॉनी यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यांना अनेक प्रक्रियांचा सामना करावा लागला. पण या सर्व प्रकारावर हृतिक व राकेश यांनी कोणतेही भाष्य केले नाही.   

Tags: bollywood actorcomedy actorHrithik Roshanjohnny leverkaho na pyar hai
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar

अनुष्का शर्मा, विराट कोहली ऋतिक रोशन, प्रियांका चोप्रा अन्…; काही सेलिब्रिटी अंबानींच्या पार्टीपासून लांब, बोलावलं नाही की आलेच नाहीत?, नेमकं काय झालं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.