मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनुष्का शर्मा, विराट कोहली ऋतिक रोशन, प्रियांका चोप्रा अन्…; काही सेलिब्रिटी अंबानींच्या पार्टीपासून लांब, बोलावलं नाही की आलेच नाहीत?, नेमकं काय झालं?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 4, 2024 | 6:15 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar

अनुष्का शर्मा, विराट कोहली ऋतिक रोशन, प्रियांका चोप्रा अन्...; काही सेलिब्रिटी अंबानींच्या पार्टीपासून लांब, बोलावलं नाही की आलेच नाहीत?, नेमकं काय झालं?

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावत या सोहळ्याची शोभा वाढविली. सलग तीन दिवस सुरु असलेल्या या सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांनी भरजरी कपडे परिधान करत हजेरी लावली. रिहाना, एकॉन, अरिजित सिंग, दिलजीत दोसांझ, श्रेया घोषाल या गायकांच्या सुरांवर कलाकार मंडळींनी नृत्य केले. मात्र, या सोहळ्यातून काही कलाकारांची नावे वगळली असल्याचं समोर आलं आहे. हृतिक रोशन या सोहळ्याला त्याच्या तब्येतीच्या समस्येमुळे येऊ शकला नाही. (Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar)

खरं तर, अनंत व राधिका यांच्या प्री-वेडिंगच्या काही दिवस आधी, हृतिक रोशनने क्रॅचच्या मदतीने एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याच्या स्नायूंना ताण आला होता आणि त्याला वेदना होत असल्याचे समोर आले होते. गेल्या वर्षी अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या साखरपुडा समारंभाला उपस्थित असलेला करण लग्नाआधीच्या सोहळ्यामध्ये दिसला नाही. NMACC उद्घाटन सोहळ्याला निक जोनाससह आलेली प्रियांका चोप्रा जामनगरमधील समारंभात सहभागी झाली नाही. मात्र, तिची आई मधु चोप्रा या कार्यक्रमाला उपस्थित होती.

आणखी वाचा – छत्तीसगढच्या रितेश पालने पटकावलं ‘डान्स प्लस प्रो’ शोचं विजेतेपद, सलॉनमध्ये करत होता काम, आता मिळाली इतकी रक्कम

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गेल्या महिन्यात आई-बाबा झालेले अनुष्का शर्मा व विराट कोहली सध्या लंडनमध्ये आहेत. लंडनमध्ये ते त्यांच्या बाळाची काळजी घेण्यात व्यस्त आहेत. या कारणामुळे ते दोघेही अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंगला उपस्थित राहू शकले नाही. या प्री-वेडिंग फंक्शनला काजोलही दिसली नाही, पण अजय देवगण व त्याची लेक न्यासा यांनी तिची अनुपस्थिती भरुन काढली. तसेच अंबानीच्या या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये देओल कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. तसेच या सोहळ्याला शिल्पा शेट्टी व तिचे कुटुंब दिसले नाही. कंगना राणौतही या फंक्शनल एकही दिवस दिसली नाही. अद्याप या कलाकार मंडळींच्या गैरहजेरीचं कारण समोर आलं नाही. तर त्यापैकी काहींना कदाचित आमंत्रित केले गेले नव्हते.

आणखी वाचा – Video : दीपिका पदुकोणनंतर कतरिना कैफही देणार गुडन्यूज?, अंबानींच्या पार्टीमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण

मात्र, जी कलाकार मंडळी उपस्थित होते त्यांच्यासाठी हा संस्मरणीय कार्यक्रम होता. सलमान खान, शाहरुख खान व आमिर खान यांनी आपल्या अभिनयाने उपस्थितांचं मनोरंजन केलं. अंबानी कुटुंबातील सदस्यांनीही या कार्यक्रमात परफॉर्म केले.

Tags: Anant Ambani-Radhika MerchantAnant Ambani-Radhika Merchant Pre Weddinganushka sharma and virat kohlientertainmentpriyanka chopra and nick jonas
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Jui Gadkari On Caste

"तुझी जात कोणती?", चाहत्याने जात विचारताच 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरी स्पष्टच बोलली, म्हणाली, "मी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.