सध्या गुजरातमधील जामनगर यथे मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीचा आयोजित केलेला सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी जगभरातून अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटी या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. या सोहळ्याआधीच अभिनेता रणवीर सिंह व अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी या वर्षी घरी चिमुकल्याचे आगमन होणार असल्याची घोषणा केली होती. या वृत्ताने सर्वांनीच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अंबानी यांच्या सोहळ्यामध्ये रणवीर व दीपिका यांनीही जबरदस्त डान्स परफॉर्मन्स सादर केला. (katrina kaif pregnancy)
तीन दिवसांचा कार्यक्रम आटोपून सर्वच जण आता आपल्या घरी जाण्यासाठी रवाना होत आहेत. अशातच अभिनेत्री कतरिना कैफचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आता कतरिना गरोदर असण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याधीही कतरिना गरोदर असल्याच्या चर्चा अनेक वेळा पसरल्या होत्या. पण तेव्हा यामध्ये कोणतेही तथ्य नव्हते. मात्र आता कतरिनाच्या ड्रेसमुळे आणि ओढणी घेण्याच्या पद्धतीमुळे नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.
सदर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कतरिना व विकी हे एकमेकांचा हात धरून चालत आहेत. कतरिनाने फिकट गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस घातला असून ओढणी पूर्णपणे गुंडाळून घेतली आहे. तसेच विकी हा निळ्या रंगाच्या जीन्स व शर्टमध्ये पाहायला मिळाला. कतरिनाच्या ओढणी घेण्याच्या पद्धतीमुळे आणि सारखा पोटावर हात ठेवत असल्याने ती गरोदर असल्याची शक्यता निर्माण झाली.
विकी व कतरिनाचा हा व्हिडीओ पाहून नेटकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “ती बेबी बंप लपवत आहे म्हणजे ती नक्कीच प्रेग्नंट आहे”. यानंतर सर्वांनाच ती गरोदर असल्याची शंका आली. त्यामुळे आता कतरिना व विकी कधी अधिकृतपणे गुडन्यूज देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा दक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीबरोबर ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटामध्ये दिसली होती. तसेच विकी आता ‘छावा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.