बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत आला आहे. आपल्या अभिनयाने कायमच चर्चेत राहणारा हा अभिनेता त्याच्या एका कृतीमुळे पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. यानिमित्ताने १ ते ३ मार्चपर्यंत या प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमासाठी बॉलिवूड हॉलिवूडसह अनेक क्षेत्रातील कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.
यावेळी शाहरुख खानने या खास कार्यक्रमात ‘जय श्री राम’ म्हणत उपस्थितांना अंबानी कुटुंबाची ओळख करून दिली. शाहरुखचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावेळी शाहरुखने आपल्या भाषणात असं म्हटलं की, “अंबानी कुटुंबातील शक्तीशाली महिला किंवा या कुटुंबातील तीन देवी लक्ष्मी, सरस्वती व पार्वती यांच्या आशीर्वादाने या कुटुंबाला जोडून ठेवले आहे”.
तसेच या भव्य कार्यक्रमात शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी खास सादरीकरणही केले. सलमानने त्याच्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातील ‘जीने के हैं चार दिन’ व ‘मुझसे शादी करोगी’ या गाण्यांवर डान्स केला, तर आमिरने ‘मस्ती की पाठशाला’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स केला. तसेच शाहरुख खानने ‘छैया ‘छैया’ गाण्यावर धमाल डान्स केला. यानंतर तिघांनीही नाटू नाटू’ या गाण्यावरही धमाल डान्स केला.
आणखी वाचा – शाळेत प्रवेश, धमाल-मस्ती अन्…; बहुचर्चित ‘आठवी अ’ वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित, दुसरा भाग कधी येणार?
दरम्यान, जामनगरमध्ये अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात आले होते. १ ते ३ मार्च असा तीन दिवस हा भाव्या कार्यक्रम पार पडल्यानंतर नुकतीच काल (३ मार्च) रोजी या कार्यक्रमाची सांगता झाली. प्री-वेडिंग फंक्शन्सनंतर येत्या १२ जुलैला या दोघांचा मुंबईत शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.