शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्ही देवाला मानत नाही” सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा; लहानपणीचा ‘तो’ अनुभव शेअर केला

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 7, 2026 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shruti Hasan Statement On God

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा

Shruti Hasan Statement On God : प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांची मुलगी आणि लोकप्रिय अभिनेत्री श्रुती हासन हिने साऊथ सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आई-वडिलांच्या ओळखीवर न थांबता, मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत श्रुतीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही रोचक गोष्टी उघड केल्या. नास्तिक विचारसरणीच्या कुटुंबात वाढ झाल्यामुळे त्यांच्या घरी देव-धर्माला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं, असं तिने सांगितलं. तिच्या म्हणण्यानुसार, वडील कमल हासन यांना धर्माविषयी चर्चा करणे अजिबात आवडत नाही.

‘रणवीर अलाहाबादिया’ला दिलेल्या मुलाखतीत श्रुतीने तिच्या भाषेबद्दल मोकळेपणाने बोललं. ती सांगते की, लहानपणापासून तिला तमिळ आणि हिंदी अशा दोन्ही भाषांचं वातावरण मिळालं. मात्र, आईच्या आग्रहामुळे घरी हिंदी आणि इंग्रजीचा अधिक वापर होत असे. याचा परिणाम तिच्या तमिळ भाषेवर झाला, असं तीने मान्य केलं आहे. श्रुती हासनने आतापर्यंत तेलुगू, तमिळ आणि हिंदी अशा तिन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘गब्बर सिंग’, ‘रेस गुर्रम’, ‘श्रीमंथुडू’, तमिळ चित्रपट ‘3’ आणि अलीकडचा ‘सलार: पार्ट 1 सीजफायर’ या सिनेमांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. बॉलिवूडमध्ये ‘रमैया वास्तावैया’ या चित्रपटातून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

आणखी वाचा – “तूच या घराची Villain आहे” भाऊच्या धक्क्यावर रितेशने रुचिताची शाळा घेत दिली शिक्षा, म्हणाला, “कुऱ्हाड उचल आणि…”

View this post on Instagram

A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan)

श्रुती म्हणाली, “जर तुम्ही पप्पांशी ज्योतिषाबद्दल बोललात तर ते तुम्हाला पळवून लावतील. त्यांना टॅटूही आवडत नाहीत. ते देवांचा तिरस्कार करतात.” तिने पुढे सांगितले की ती विक्का (देवतांची पूजा) वर विश्वास ठेवते. “आमचे पूर्वज महिला होत्या. म्हणूनच मी विक्का आणि मूर्तिपूजेवर विश्वास ठेवते. आम्ही अशा चेटकिणींची नातवंडं आहोत ज्यांना जाळता येत नव्हते. मला वाटते की त्यांचे रक्त माझ्या नसांमध्ये वाहते.” असं म्हणतं तिने भावना व्यक्त केल्या. पालक वेगळे झाल्यानंतर श्रुती मुंबईत आली. तिचं बालपण इतर मुलांसारखं सर्वसाधारण नव्हतं, असंही ती सांगते. चित्रपटांच्या सेटवर वाढल्यामुळे तिच्या आयुष्यात अनेक वेगळे अनुभव आले. तिचे पालक कधीच शाळेत न गेले असल्यामुळे, मुलांच्या शिक्षणाबाबत त्यांच्याकडे ठराविक चौकट नव्हती, हेही श्रुतीने प्रामाणिकपणे मान्य केलं. या सगळ्या अनुभवांनीच आपल्याला आजची श्रुती हासन घडवलं, असं ती म्हणते.

आणखी वाचा – ‘इश्काचा नादखुळा’ फेम अभिनेत्रीच्या घरी लगीनगाई, थाटात पार पडला मेहेंदी सोहळा, फोटो समोर

Tags: bollywood newsentertainmentShruti Hasan Statement On God
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Divya Shinde Post Viral

दिव्या शिंदेची ‘बिग बॉस’ घरातून हकालपट्टी; जीवे मारण्याच्या धमकीनंतर बाहेर येताच तिची पोस्ट व्हायरल, म्हणाली, "लवकरच उत्तर देईन"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.