बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिव्या शिंदेची ‘बिग बॉस’ घरातून हकालपट्टी; जीवे मारण्याच्या धमकीनंतर बाहेर येताच तिची पोस्ट व्हायरल, म्हणाली, “लवकरच उत्तर देईन”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 7, 2026 | 5:33 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Divya Shinde Post Viral

दिव्या शिंदेची ‘ती’पोस्ट चर्चेत.jpg

Divya Shinde Post Viral : ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 च्या घरात सुरु असलेल्या सततच्या भांडणांमुळे आणि काही स्पर्धकांच्या वागणुकीमुळे शो सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. अनेक वेळा ‘बिग बॉस’कडून सूचना आणि ताकीद देऊनही काही स्पर्धकांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. या सगळ्यात एक धक्कादायक प्रसंग घडला आणि त्यानंतर ‘बिग बॉस’ला कठोर निर्णय घ्यावा लागला. स्पर्धक दिव्या शिंदे हिने घरातील सदस्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार ‘बिग बॉस’च्या नियमांचा गंभीर भंग ठरल्याने दिव्याला घराबाहेर काढलं आहे. दिव्याला सोशल मीडियावर ‘सरकार’ या नावाने ओळखलं जात होतं. मात्र तलवार चालवण्याच्या आणि हिंसाचाराच्या धमक्या राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर दिल्याने ‘बिग बॉस’ने तिच्यावर थेट कारवाई केली.

घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्याच्या वतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांचे आभार मानत लवकरच सर्व गोष्टी स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं आहे. “माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. सध्या अनेक गोष्टी सुरू आहेत, पण काळजी करू नका. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी लवकरच देईन. मी लवकरच लाईव्ह येऊन संवाद साधेन. सत्य नक्की समोर येईल, तोपर्यंत संयम ठेवा,” असं तिच्या स्टोरीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, दिव्याच्या निष्कासनानंतर सोशल मीडियावर खूप प्रतिक्रिया उमटत आहेत. तिचे समर्थक “सरकार इज बॅक” अशा कमेंट्स करत तिला पाठिंबा देत आहेत. तर दुसरीकडे अनेक प्रेक्षकांनी तिच्या आक्रमक भाषेवर नाराजी व्यक्त करत बिग बॉसच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

आणखी वाचा – ‘इश्काचा नादखुळा’ फेम अभिनेत्रीच्या घरी लगीनगाई, थाटात पार पडला मेहेंदी सोहळा, फोटो समोर

एका टास्कदरम्यान तन्वी कोल्ते हिने दिव्याचं नाव घेतल्याने वातावरण तापलं. रागाच्या भरात दिव्याने मर्यादा ओलांडत स्वतःला ‘सरकार’ म्हणत बाहेर तलवार बाळगते, आणि ती कोणावर चालवायची हे समोरच्यांच्या वागण्यावर अवलंबून असेल, असं विधान केलं. हा प्रकार गंभीर असल्याने ‘बिग बॉस’ने तिला माफी मागण्याची संधी दिली होती. मात्र दिव्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे अखेर ‘बिग बॉस’ने तिला शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. आता या घटनेनंतर ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात पुढे काय घडणार?, आणि या वादाचा शोवर काय परिणाम होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी वाचा – “आम्ही देवाला मानत नाही” सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा; लहानपणीचा ‘तो’ अनुभव शेअर केला

Tags: Bigg Boss Marathi 6Divya Shinde Post Viralmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
bb marathi rakhi sawant

'बिग बॉस मराठी ६'च्या घरात राखी सावंतची एंट्री, घरात येताच स्पर्धकांची हवा टाईट, सिझन गाजणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.