शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘इश्काचा नादखुळा’ फेम अभिनेत्रीच्या घरी लगीनगाई, थाटात पार पडला मेहेंदी सोहळा, फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 7, 2026 | 12:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshaya Hindalkar Mehendi Ceremony

अक्षयाच्या हातावर रंगली विशालच्या नावाची मेहेंदी

Akshaya Hindalkar Mehendi Ceremony : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘येडं लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेता विशाल निकम सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. मागील काही दिवसांपासून विशाल निकमची ‘सौंदर्य’ नेमकी कोण आहे? असा प्रश्न त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहून चाहत्यांना पडत होता. दरम्यान, विशाल निकमने सोशल मीडियावर एक नवी पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याच्यासोबत एक तरुणी दिसत आहे. मात्र, या पोस्टमध्ये त्या तरुणीचा चेहरा त्याने दाखवलेला नव्हता. यामुळे ती सुंदरी, म्हणजेच ‘सौंदर्य’ नेमकी कोण आहे? हा प्रश्न चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला. दरम्यान विशालने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर करत अखेर त्याच्या सौंदर्याचा चेहरा दाखवला. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून अक्षया हिंदळकर आहे हे या पोस्टद्वारे स्पष्ट झालं.

आणखी वाचा: “तूच या घराची Villain आहे” भाऊच्या धक्क्यावर रितेशने रुचिताची शाळा घेत दिली शिक्षा, म्हणाला, “कुऱ्हाड उचल आणि…”

दरम्यान विशालने अखेर प्रेमाची कबुली दिल्यानंतर अभिनेत्रींच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. आता विशाल आणि अक्षया यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून अक्षयाचा मेहेंदी सोहळा नुकताच पार पडला. तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटोस आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अक्षया हिंदळकर आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मेहेंदी सोहळ्यासाठी अक्षयाने खास लूक केलेला पाहायला मिळाला. तिने इरकल साडीचा पारंपरिक ड्रेस घातला होता. हातावर खास सखी आणि फुलपाखराची डिझाइन मेहेंदीतून काढल्याचं दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने विशाल निकमला टॅग केलं आहे. “माझ्या मेहेंदीमध्ये तुझं नाव शोधायला तयार राहा”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. ही पोस्ट रिशेअर करत विशालने “मी शोधलं आहे माझं नाव” असं कॅप्शन दिल आहे. (Akshaya Hindalkar Mehendi Ceremony)

View this post on Instagram

A post shared by Akshhaya Hindallkar 🦋 (@me_mrugasi)

अक्षया आणि विशाल गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात विशालने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र सुंदराचं नाव त्याने गुलदस्त्यात ठेवलं होतं. काही दिवसांपूर्वीच अक्षया आणि विशालने त्यांचं नातं ऑफिशियल केलं आहे. आता लग्न करत ते संसार थाटणार आहेत. अक्षयाने तुझ्या इश्काचा नादखुळा, साता जन्माच्या गाठी, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर विशाल मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’, ‘आई मायेचं कवच’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकांमध्ये तो दिसला होता. सध्या तो स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. (Akshaya Hindalkar Mehendi Ceremony)

आणखी वाचा: दोन अभिनेत्यांची जवळीक भोवली…; ‘बिग बॉस’ विजेता गौरव खन्नाच्या पत्नीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांचा संताप

Tags: Akshaya Hindalkar Mehendi Ceremonyentertainmentvishal nikam
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Shruti Hasan Statement On God

"आम्ही देवाला मानत नाही" सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा; लहानपणीचा 'तो' अनुभव शेअर केला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.