शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तूच या घराची Villain आहे” भाऊच्या धक्क्यावर रितेशने रुचिताची शाळा घेत दिली शिक्षा, म्हणाला, “कुऱ्हाड उचल आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 7, 2026 | 11:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

रितेशने रुचिताची शाळा घेत दिली शिक्षा

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन 6 चा चौथा आठवडा प्रचंड वाद आणि भांडणंमुळे चर्चेत राहिला आहे. या आठवड्यात घरातील वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. रुचिताचं आधी राकेश बापटसोबत जोरदार भांडण झालं आहे. त्यानंतर दिपाली सय्यदसोबतचा तिचा वादही चांगलाच चर्चेत राहिला. दुसरीकडे दिव्या शिंदेने दिलेल्या धमकीमुळे ‘बिग बॉस’ने तिला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला. एकूणच घरात सुरू असलेल्या या गोंधळामुळे प्रेक्षकांचं लक्ष संपूर्णपणे ‘भाऊचा धक्का’ या विकेंडच्या विशेष भागाकडे लागलं होतं. अखेर या भागाचा पहिला प्रोमो समोर आला आहे, त्यामध्ये होस्ट रितेश देशमुख चांगलाच संतापलेला दिसत आहे.

‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये रितेश देशमुख थेट रुचितावर निशाणा साधताना दिसतो. रितेश म्हणतो, “रुचिता, या घरातला सगळ्यात मोठा व्हिलन तुम्ही ठरला आहात. सतत उद्धट वागणं, टास्क कसा रद्द होईल हेच पाहणं आणि दररोज लिमिट क्रॉस करणं असं एकही दिवस नाही गेला.” रितेशच्या या शब्दांमुळे घरातील सदस्यही चकित होताना दिसले. यानंतर रितेश रुचिताच्या हातात कुऱ्हाड देत “ही कुऱ्हाड घ्या” असं म्हणतो आणि इथेच प्रोमो संपतो. या सीनमुळे आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार?, याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

आणखी वाचा – दोन अभिनेत्यांची जवळीक भोवली…; ‘बिग बॉस’ विजेता गौरव खन्नाच्या पत्नीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांचा संताप

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

दरम्यान, या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत. काही जण म्हणतात, की रुचिता शांतपणे खेळली तर ती चांगली खेळाडू ठरू शकते, तर काहींनी तिला घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे. रुचिताच्या सततच्या भांडणांवर नाराजी व्यक्त करणाऱ्या कमेंट्सही दिसून येत आहेत. तसेच दिव्या शिंदेच्या निष्कासनावरही चाहत्यांमध्ये प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. आता आजच्या ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये रितेश देशमुख आणखी कोणाची शाळा घेणार?, आणि घरात पुढे कोणता नवा ट्विस्ट येणार?, हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे.

आणखी वाचा – “माझंही नुकसान झालं”, कलाकारांना वेळेत न मिळणाऱ्या मानधनाबाबत अभिनेत्रीची प्रतिक्रिया, म्हणाली, “जेवढी स्क्रिप्ट महत्त्वाची…”

Tags: Bigg Boss Marathi 6entertainment newsmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Akshaya Hindalkar Mehendi Ceremony

'इश्काचा नादखुळा' फेम अभिनेत्रीच्या घरी लगीनगाई, थाटात पार पडला मेहेंदी सोहळा, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.