आपलं घर सुंदर असावं! असं कोणाला वाटत नाही. अनेकांना घर सजवण्याची खूप आवड असते. प्रत्येक जण स्वतःचे घर सजवण्यासाठी काही ना काही करत असतो. कोणी फुलांनी घर सजवतो तर, तर कोणी फर्निचर, झोपाळा या सगळ्या वस्तूंनी. मात्र या घराची शोभा तुम्हाला अजूनच वाढवायची असेल तर काही घरांमध्ये काही तांबे, पितळेच्या वस्तु ठेवल्या जातात. या वस्तु घराची शोभा तर वाढवतात मात्र यामुळे सकारात्मकतादेखील येते. पण या तांब्या-पितळेच्या वस्तु दुकानांमध्ये अवाच्या सव्वा रुपयांना मिळतात. त्यामुळे अनेकजण या ऐवजी प्लॅस्टिकच्या वस्तु ठेवतात. मात्र आता आम्ही अशी माहिती देणार आहोत ज्याचा तुम्हाला घर सजावटीसाठी फायदाच होईल. (Antique Vintage Furniture Handicrafts)
असं म्हणतात की घर सजवायचे असेल तर खर्च हा होतोच. त्यातल्या त्यात तुम्हाला शोभेसाठी तांब्या-पितळ्याच्या गोष्टी ठेवायच्या असतील तर हमखास होतोच होतो. पण हा खर्च कमी कसा करता येईल? याबद्दल आपण जाणून घेऊया. मुंबई येथील दादरमध्ये असे एक दुकान आहे ज्यामध्ये या शोभेच्या वस्तु तुम्हाला परवडतील अशा दरात मिळतील. ‘जोधपुर हँडीक्राफ्ट’ या दुकानामध्ये तुम्हाला अगदी २०० रुपयांपासूनच्या चांगल्या दर्जाच्या वस्तु मिळतील. विशेष म्हणजे हे सगळे हँडीक्राफ्ट बाहेर खूप महाग मिळतात मात्र या दुकानामध्ये तुम्हाला परवडणाऱ्या दरात मिळतील. तसेच आता या दुकानामध्ये १०% ते १५% पर्यंत सवलतदेखील मिळत आहे.
तुम्ही बघायला गेलात तर या ठिकाणी खूपच सुंदर असे शो पीस ठेवण्यात आले आहेत. टेबलवर ठेवण्याचे, भिंतीवर अडकवण्यासाठी, छोटे वेगळ्या पद्धतीचे कंदील, नवीन वर्षामध्ये कोणालाही भेट देता येतील आशा नाजूक सुंदर तसेच आकर्षक वस्तु मिळतील. त्यामुळे आता तुम्हाला कोणाला स्वस्तात मस्त पण आकर्षक अशी भेट वस्तु द्यायची असेल तर या ठिकाणी २०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत उपलब्ध होतील. तसेच या ठिकाणी सुंदर आशा लाकडाच्या खुर्च्या, टेबलदेखील मिळतील.
तुम्हाला या आशा सुंदर गोष्टी खरेदी करायच्या असतील तर, जोधपुर हँडीक्राफ्ट, सॅलव्हॅशन हायस्कूलच्या बाजूला, सूरज पॅलेटच्या समोर, पोर्तुगीज चर्चच्या समोर, एस. के. रोड दादर पश्चिम या पत्त्यावर जाऊन विकत घेऊ शकता. तसेच होम डिलिव्हरी हवी असल्यास ९७६८३६१००८ या क्रमांकावरही संपर्क साधू शकता.