रंग माझा वेगळा या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीलवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्रीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी रेश्मा काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. नोव्हेंबर महिन्यात अचानक केळवणाचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या सगळ्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. यानंतर वैयक्तिक आयुष्यात रेश्माने २९ नोव्हेंबरला पनवशी लग्न केलं. (Reshma Shinde Ukhana)
जवळचे मित्रमंडळी, नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत रेश्माचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. रेश्माच्या लग्नाचे काही विधी मराठमोळ्या पद्धतीने पार पडले. दोघांनी त्यांच्या लग्नात मराठमोळा व दाक्षिणात्य असे दोन लूक केले होते. यावेळी दोघांनी एकमेकांसाठी खास उखाणाही घेतला आणि या उखाण्याचा व्हिडीओ रेश्माने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. रेश्माने शेअर केलेल्या या व्हिडीओ मध्ये तिच्या लग्नाची संपूर्ण झलक पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – लग्न न करता रस्त्यावरील अनाथ, बेघर व गरीबांसाठी झटणारी ‘आई’, ही महिला आहे तरी कोण?
सप्तपदी, मंगलाष्टके अन् बरेच खास क्षण या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी रेश्माने पवनसाठी खास उखाणा घेत म्हटलं की, “जे स्वप्न पाहिलं होतं ते आज मिळालं… खरं सुख काय असतं हे पवनमुळे कळालं” तर, यानंतर पवननेही आपल्या बायकोसाठी खास इंग्रजीत उखाणा घेतला. “Six Plus Three is Equal to Nine & Reshma is Mine”. पवनच्या या उखाण्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर रेश्मा-पवनच्या लग्नाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – भेट देण्यासाठी, घर सजवण्यासाठीच्या सुंदर वस्तु मिळतील अगदी २०० रुपयांमध्ये, घडयाळ, खुर्च्या आणि बरंच काही
दरम्यान, अभिनेत्रीच्या नवऱ्याबद्दल सांगायचे झाल्यास तो गेल्या ७ वर्षांपासून यूकेमध्ये वास्तव्यास होता आणि तो आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. रेश्मासाठी तो भारतात परतल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. तर रेश्माने ‘लगोरी’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहुल’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. यापैकी ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत तिने साकारलेलं दीपा हे पात्र खऱ्या अर्थाने घराघरांत लोकप्रिय झालं.