बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गोविंदा यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. आजवर गोविंदा यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांचे खासगी आयुष्यदेखील अनेकदा चर्चेत राहिलेले बघायला मिळाले. चित्रपटांमध्ये काम करत असतानाच त्यांनी सुनीता यांच्याबरोबर विवाह केला. त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सुरुवातीला कधीच कोणाला कळू दिले नाही. मात्र काही वर्षांनंतर त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या लग्नानंतर गोविंदा यांची नावं अनेक अभिनेत्रीबरोबरही जोडली गेली. मात्र त्याची पत्नी सुनीता यांनी या सगळ्याच नात्यावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. (sunita ahuja on govinda)
गोविंदा व सुनीता हे अनेकदा कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. यावेळी ते अनेकदा त्यांच्या नात्यावरही भाष्य करतात. जेव्हा सुनीता यांना गोविंदा यांच्या इतर अभिनेत्रींबद्दल विचारले जाते तेव्हा त्या म्हणतात की, “माझ्या व गोविंदामध्ये सामान्य नवरा-बायकोसारखा व्यवहार नाही. आम्ही दोघं नवरा बायको आहोत असं मला आजपर्यंत वाटलं नाही. आम्ही एकमेकांना शिव्या देतो”. नंतर त्या म्हणाल्या की, “मी त्यांना विचारते की खरचं तू माझा नवरा आहेस का?”.
त्यानंतर त्यांनी लग्नाच्या आधीचा एक किस्सादेखील शेअर केला आहे. त्यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले होते की, “गोविंदा यांनी लग्नाच्या आधी मी मिनी स्कर्ट घातलेला त्यांच्या आईला आवडणार नाही असं सांगितलं होतं. तसेच त्यांना जेव्हा भेटायला जायच्यावेळी साडी नेसण्यासाठी सांगितले होते. मी साडी नेसून गेले होते. माझ्या सासूबाईंना मी आवडले आणि आमचं लग्न झालं”.
गेले ३५ वर्ष गोविंदा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. या कार्यकाळात ‘आंखे’, ‘साजन चले सासुराल’, ‘कुली नं १’, ‘एक और एक ग्यारह’, ‘भागमभाग’ व ‘पार्टनर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. गोविंदाचा मुलगा यशवर्धनदेखील आता वाडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार २०२५ मध्ये यशवर्धन चित्रपटांमध्ये काम करताना दिसू शकतो.