बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा नुकताच ४७ वा वाढदिवस साजरा झाला. त्याने ‘साथिया’, ‘शूट आउट अॅट लोखंडवाला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मनं जिंकली. पण त्यानंतर त्याची बॉलिवूडची कारकीर्द अचानक संपुष्टात येऊ लागली. यामागचं नेमकं कारण काय होतं याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय व अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांचं ब्रेकअप कोणापासूनही लपलेला नाही. दोघांच्या ब्रेकअपची बरीच चर्चा झाली होती. त्यांच्या ब्रेकअपचं कारण ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खान असल्याचे म्हटलं जातं होतं.(Vivek blamed to spoiled career)
आता, अनेक वर्षानंतर त्याने या संपूर्ण प्रकरणावर आपले मौन तोडले आहे. जवळपास २० वर्षांनंतर त्याने आपल्या ब्रेकअपबाबत खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की ब्रेकअपमुळे त्यांच पूर्ण आयुष्य बिघडलं त्यामुळे त्याचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झालं होतं. अलीकडेच इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत विवेकने ब्रेकअपनंतर अनुभवलेल्या वाईट काळाबद्दल सांगितलं. त्याने असही म्हटलं आहे की या परिस्थितीनंतर त्याच्या कुटुंबाला त्याचा अभिमान वाटतो.
वाचा – विवेकचं करिअर अचानक का थांबलं? (Vivek blamed to spoiled career)
“माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा इंडस्ट्रीतील अनेक शक्तिशाली लोकांनी माझं करिअर बरबाद करायचं ठरवलं होतं. त्यानंतर माझा ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ हा चित्रपट आला. या चित्रपटातील माझ्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आणि त्यासाठी मला पुरस्कारही मिळाला होता. पण तरीही त्यानंतर माझ्याकडे कोणतंही काम नव्हतं. मी एक ते दीड वर्ष घरात बसून होतो. माझ्याकडे कोणीही चित्रपट घेऊन येत नव्हतं”.
दुसरीकडे त्याला असाही प्रश्न विचारण्यात आला की, ऐश्वर्या रायमुळे त्याच्या करिअरवर परिणाम झाला का, या प्रश्नावर त्याने उत्तर दिलं की, “मला यावर काहीही बोलायचं नाही. पण मी सगळ्यांना नक्कीच सुचवू इच्छितो की जर तुमच्यात टॅलेंट आहे तर ते दुसऱ्यां कोणामुळे वाया घालवू नका. जर तुमचा पार्टनर तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये समस्या निर्माण करत असेल तर ते चुकीचे आहे”. भूतकाळातील घटणांमुळे त्याच्या आयुष्यावर परिणान झाला असला तरीही आता विवेक व ऐश्वर्या आपापल्या आयुष्यात कुटुंबासह आयुष्य जगत आहेत.