मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार अभिनयाव्यतिरिक्त अनेक क्षेत्रांमध्ये आपलं नशीब आजमावताना दिसत आहे. काही कलाकार हॉटेल व्यवसायात उतरली आहे, तर काही जणांचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड आहे. अभिनेते सुनील बर्वे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात प्रचंड सक्रिय आहे. त्याचबरोबर ते फूड व्यवसायात आपला जम बसवत आहे. अभिनेते सुनील बर्वे यांनी गोरेगाव येथे आपलं स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता. त्यांच्या या व्यवसायाला नुकतीच २ वर्ष पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक शेअर केली आहे. (Sunil Barve’s sweet shop)
अभिनेते सुनील बर्वे यांनी काही वर्षांपूर्वी गोरेगाव येथे ‘चितळे एक्सप्रेस’ नावाने मिठाईचं दुकान सुरु केले आहे. ज्याच्या उद्घाटनाला सचिन खेडेकर, वंदना गुप्ते व अन्य कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या या स्वीट शॉपला नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त सुनील बर्वे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुनील यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व स्वीट शॉपमधील कर्मचारी दिसत आहे.
हे देखील वाचा – “पुन्हा सांगतो लक्षात घे” किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत, म्हणाले, “एका फटक्यात भानावर…”
या फोटोसह लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणाले, “आमच्या ‘चितळे एक्सप्रेस’ गोरेगाव पश्चिम आउटलेटचा दुसरा वर्धापनदिन नुकताच साजरा झाला. खरोखरच समृद्ध करणारा अनुभव आहे. ही दोन वर्ष यशस्वी करणाऱ्या सर्व ग्राहकांचे मनःपूर्वक आभार मानतो. अर्थातच आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि संपूर्ण चितळे परिवाराचेही खूप खूप आभार मानतो. मी माझ्या शॉपच्या उद्घाटनाला आल्याबद्दल अभिनेते सचिन खेडेकर, वंदना गुप्ते, सिद्धार्थ जाधव यांचेदेखील विशेष आभार मानतो.” त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकरी व कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – “करिअर उद्धवस्त कारण…”, ऐश्वर्या रायबरोबरच्या नात्यावर विवेक ओबेरॉयचा २० वर्षांनी खुलासा, म्हणाला, “रिलेशनशिपबाबत…”
अभिनेते सुनील बर्वे हे ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत दिसले होते, ज्याने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. सुनील बर्वे लवकरच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात दिसणार आहे. ज्यात ते प्रख्यात संगीतकार व गायक सुधीर फडके यांची भूमिका साकारणार आहे.