बुधवार, जून 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मेहंदीच्या दिवसांत लीला घरातून गायब, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत नवीन ट्विस्ट, या संकटातून एजे लीलाला कसं सोडवणार?

Saurabh Moreby Saurabh More
मे 4, 2024 | 12:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla serial update new twist

मेहंदीच्या दिवसांत लीला घरातून गायब, 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत नवीन ट्विस्ट, या संकटातून लीला एजेला कसं सोडवणार?

मालिका आणि त्यात येणारे ट्विस्ट हे जणू एक समीकरणच झाले आहे. कथानकाला अचानक मनोरंजक वळण देण्यासाठी मालिकेच्या निर्मात्यांकडून त्यात काही ट्विस्टची भर केली जाते. झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतही नुकताच असा एक नवीन ट्विस्ट आला आहे. अभिराम जहागीरदारच्या घरी सध्या मेहंदीचा सोहळा रंगणार आहे. मात्र, अजूनही लीलाला लग्न करायचं नाही. त्यामुळे लीला एजेबरोबर लग्न करण्यासाठी तिच्या परीने प्रयत्न करत आहे. याच ट्विस्टबद्दल उत्सुकता निर्माण करणारा एक प्रोमो चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

या प्रोमोमध्ये लीलाचे अपहरण झाले असून लीलाला शोधण्यासाठी एजे घराबाहेर पडला आहे. लीला व एजेचं लग्न होऊ नये म्हणून दुर्गा एक कट रचत आहे. दुर्गाच्या या प्लॅनमध्ये लीला स्वतःदेखील सामील झाली आहे. तर, दुसरीकडे विक्रांतने साळुंकेला हाताशी धरून एक नवा प्लॅन सुरू केला आहे. अभिरामने तुरुंगात धाडल्यामुळे चिडलेला साळुंके आता त्याचा बदला घेण्यासाठी हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, विक्रांतने साळुंकेला तुरुंगातून बाहेर काढून, त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे साळुंके एजे-लीला यांच्या मेहंदी सोहळ्यात वेश बदलून वेटरच काम करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “एकुलत्या एक मुलीलाही वेळ देता येत नाही आणि…”, सविता प्रभुणेंचं खासगी आयुष्याबाबत भाष्य, म्हणाल्या, “मालिका करताना…”

दुर्गाने आयत्यावेळी घरातील सगळ्या लाईट घालवून लीलाला पळवण्याचा प्लॅन केला होता. या प्लॅननुसार एक गाडी पार्किंगमध्ये लीलाची वाट पहात थांबली होती. मात्र, दुर्गाचा हा प्लॅन साळुंकेला आधीच कळला आणि त्याने दुर्गाच्या माणसाला बेशुद्ध करून आपल्या माणसाला लीलाला किडनॅप करण्यास सांगितले. दुसरीकडे ही गाडी आणि हा माणूस दुर्गाची असल्याचे समजून, लीलाने देखील स्वतःच गाडीत उडी घेत ड्रायव्हरला गाडी सुरू करण्यास सांगितले. लीला या गाडीत बसली असली तरी, ही गाडी साळुंकेने लीलाला किडनॅप करण्यासाठी पाठवल्याचे तिला कळले नाहीये. त्यामुळे आता लीला पुरती अडकली आहे.

आणखी वाचा – “विकृत चाळे, प्रसिद्धीची भूक”, डान्स व्हिडीओवरुन हिणावल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “लांडगेदादा आम्हाला…”

या प्रोमोमध्ये एजे लीलाला शोधायला निघाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता लीलाचे अपहरण केलेल्या लोकांना एजे शोधून काढणार का? लीलाच्या इच्छेविरुद्ध एजे-लीलाचे लग्न होणार का? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे आता आगामी भागांत काय पाहायला मिळेल? यासाठी मालिकेचे चाहते उत्सुक आहेत.    

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsNavri Mile Hitlerla
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

mangesh desai the maharashtra files
Entertainment

सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, १२ जूनपासून जवळच्या चित्रपटगृहात

जून 9, 2026 | 10:59 am
Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Next Post
Tharla tar mag serial fan named his kittens Sayali, Arjun, Chaitanya, Sakshi

'ठरलं तर मग'वरुन घरातील मांजरांची नावं ठेवली सायली-अर्जुन, जुई गडकरीलाही बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाली, "आता त्यांची नावंही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.