कलाकार हे एखाद्या मालिकेत जेव्हा काम करत असतात तेव्हा त्यांच्या असण्याची, त्यांना दररोज एका ठराविक वेळेत पाहण्याची आपल्याला सवय झालेली असते. मात्र मधूनच हे कलाकार मालिकेतील एक्झिट घेतात किंवा काही काळ काही कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतात तेव्हा प्रेक्षक वर्गही या कलाकारांना मिस करतात. अशीच शुभविवाह या मालिकेतील अभिनेत्री विशाखा सुभेदार म्हणजेच सगळ्यांची लाडकी रागिणी हिने काही काळ मालिकेतून ब्रेक घेतला आहे.(Vishakha Subhedar Post)
पहा शुभमंगल मालिकेसाठी विशाखाची लक्षवेधी पोस्ट (Vishakha Subhedar Post)
विशाखा सुभेदार यांच्या कुर्रर्रर्र या नाटकाचा अमेरिका दौरा सुरु असल्याने त्यांनी मालिकेतून ब्रेक घेत अमेरिका गाठली आहे. असे असले तरी विशाखा मात्र त्यांच्या या मालिकेतील पात्राला मिस करत असल्याची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे,. विशाखा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असे लिहिले आहे की, Missing रागिणी….. शुभविवाह..! स्टारप्रवाह वर.. दुपारी दोन वाजता..! नव्या सिरीयल,नवीन भूमिकेतून,लगेचच इतका मोठा break घेणं शक्य नसत..
पण खुप आधीपासून ठरलेला हा दौरा..त्यामुळे ह्या dates मी नसणार.. हे माहित असूनही इतकी महत्वाची भूमिका मला दिलीत… माझा हा दौरा तुम्ही adjust केलात.खरच तुमचे मना पासून आभार.. स्टार प्रवाह.आणि आमचे producer महेश तागडे ह्यांचे ही आभार. रागिणी रंगवण..जीव ओतून करते आणि करत राहीन. Missing रागिणी. अशी लक्षवेधी पोस्ट विशाखा यांनी केली आहे.(Vishakha Subhedar Post)
हे देखील वाचा – ललितची मिस्ट्री गर्ल आली समोर, रिंकू आणि ललितचा रोमँटिक अंदाज
विशाखा सुभेदार यांनी आजवर अनेक मालिका, नाटकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडली. विशाखा यांनी आजवर महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक वर्गाला खळखळून हसवलं. शुभमंगल या मालिकेतून कमबॅक करत विशाखा या पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या. शिवाय त्यांचं कुर्रर्रर्र हे नाटकही महाराष्ट्रासोबत अमेरिकेत गाजतंय. कुर्रर्रर्र नाटकाची संपूर्ण टीम सध्या अमेरिकेत असून तिथल्या लोकांचं मनोरंजन करतेय.