ललितची मिस्ट्री गर्ल आली समोर, रिंकू आणि ललितचा रोमँटिक अंदाज

Lalit Prabhakar and Rinku Rajguru
Lalit Prabhakar and Rinku Rajguru

आज एखाद्या कलाकाराने सोशल मीडियावर पोस्ट केली की ती पोस्ट अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरते. दोन दिवसांपासून अभिनेता ललित प्रभाकरच्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होत. पाठमोऱ्या मुलीसोबतचा एक फोटो त्याने पोस्ट केला होता आणि त्यात ओळखा पाहू असं कॅप्शन दिल होत. त्याच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता मात्र या पोस्टमागचं गुपित उलगडलं असून ललित सोबत असलेली ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रिंकू राजगुरू आहे. ललितने रिंकूसोबतचे एक फोटोशूटचे फोटो त्याच्या इंस्टाग्रामवरून शेअर केले असून लवकरच ते दोघे पहिल्यांदा एका सिनेमात झळकणार असल्याचं सांगितलं आहे.(Lalit Prabhakar and Rinku Rajguru)

photo credit : Instagram

रविवारी आयोजित एका बैलगाडा शर्यतीत त्याने ही घोषणा नेमकी काय आहे, याचा उलगडा केला. त्यांचा आगामी सिनेमा ‘खिल्लार’मध्ये ही जोडगोळी पाहायला मिळणार आहे. नुकतंच खिल्लारचे पोस्टरही समोर आले आहे. ललित आणि रिंकूचा आगळावेगळा अंदाज मोठया पडद्यावर एकत्र पाहणं रंजक ठरेल.

पहा कोण आहे ललिताची मिस्ट्री गर्ल (Lalit Prabhakar and Rinku Rajguru)

गेल्या अनेक वर्षांपासूनची ही बैलगाडा शर्यतीची परंपरा गावोगावी जपलेली आहे. आता या बैलगाडा शर्यतींचा जल्लोष चित्रपट गृहांमध्येही पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्यां खिल्लार या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली असून, बैलगाडा शर्यतीचा धुरळा या सिनेमातून उडताना पाहणं रंजक ठरणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच ललित प्रभाकर आणि रिंकू राजगुरू ही जोडी पाहायला मिळणार आहे. (Lalit Prabhakar and Rinku Rajguru)

photo credit : instagram

आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे असल्याचं नेहमीच अधोरेखित करण्यात आलं आहे. बैलगाडा शर्यतींसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उत्सुकता आपल्या राज्याइतकी इतर कुठे पाहायला मिळत असेल असं वाटत नाही.

हे देखील वाचा – राज कावेरीच्या टपरीवर गुंडांचा हल्ला, रत्नमाला झाल्या जखमी! काय असणार राज कावेरीचं पुढचं पाऊल?

ललित आणि रिंकूने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबतची पोस्ट केली असून इतर कलाकार मंडळींनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.  या फ्रेश जोडीला नव्याने रुपेरी पडद्यावर पाहायला चाहते ही उत्सुक असल्याचं दिसतंय. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Shivali Parab New Movie
Read More

पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार शिवाली

मालिकाविश्व गाजवल्यानंतर कलाकार मंडळी आपली पावलं सिनेसृष्टीकडे वळवतात. सिनेसृष्टीत पाऊल टाकत ही कलाकार मंडळी आपल्या कलेने प्रेक्षकांच्या आणखी…
Vanita Kharat talks obesity
Read More

‘मी जाड आहे पण..’ लठ्ठपणावर केलं वनिताने परखड भाष्य

परखड, बिनधास्त व्यक्तिमत्वांमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात. आपल्या मनाला वाटेल ते कायम करणं,…
Onkar Bhojane Ankita Walavalkar
Read More

अंकिता आणि ओंकारच्या हळदीची रंगली चर्चा

कलाकार मंडळींनी आपला क्रश सांगितला की, प्रेक्षक त्यांच्यात नातेसंबंध असल्याच्या चर्चा करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेल्या ओंकार…
Hindustani Bhau Sameer Wankhede
Read More

हिंदुस्थानी भाऊचा समीर वानखेडेला पाठिंबा-जाणून घ्या काय म्हणाला हिंदुस्थानी भाऊ?

एनसीबी चे माजी संचालक समीर वानखेडे,अभिनेता शाह रुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेल्या अटकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले