गेलेली वेळ कधीच परत येत नाही, राहतात त्या फक्त आठवणीच. मात्र काही खास क्षण आपण कॅमेऱ्यात टिपतो. आणि जेव्हा ते फोटो समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्या पुढे उभा राहतो. असच काहीसं झालं आहे एका विनोदी अभिनेत्यासोबत. त्याने देखील त्याच्या तरुणाईतला एक फोटो शेअर केला आहे.(samir choughule)
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी शो प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन करतोय. या शो मधील सर्वच पात्रांवर चाहते भरभरून प्रेम करतात. तर विनोदी कौशल्यामुळे अभिनेता समीर चौगुले यांना विनोदाचा बादशहा अशी ओळख मिळाली. तसेच त्यांच्या काही चित्रपटातील भूमिकेचं ही चाहत्यांकडून तसेच सर्वच स्थरातून कौतुक केलं जातंय . यासोबत समीर सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. अशातच त्यांनी ९ वर्षाआधीचा एक फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
Throwback २०१४ अस म्हणत त्यांनी हा फोटो शेअर केला. तर या फोटोत त्याच्या सोबत अभिनेत्री नम्रता संभेराव देखील पाहायला मिळतेय पण खर तर या फोटोत समीरला ओळखणं देखील कठीण झालं. पण या फोटोवर अनेक चाहत्यांनी पसंती देत सर तेव्हा केस होते का की विगच आहे,खोट्या केसांचा राजकुमार अश्या अनेक मजेशीर कमेंट केल्यात पण या फोटोवर विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार हीने कोवळा माल पण विग आहेच.. अशी भन्नाट कमेंट केली आहे तर या कमेंटवर अनेकांनी हास्याचा पाऊस पाडला आहे.
====
हे देखील वाचा – “मराठी मालिकेत फालतूपणा का दाखवत आहेत?” जयदीप-गौरीचा रोमँटिक सीन पाहून प्रेक्षक संतापले
====
विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि अभिनेता समीर चौगुले हे चांगले मित्र आहेत हे सगळेच जाणून आहेत त्यांची स्कीट मधील जोडी चाहत्यांनी कायमच डोक्यावर उचलून धरली. तर ते दोघे नेहमी एकमेकांच्या कामाचं कौतुक करतात आणि एकमेकांची मस्करी देखील करतात यावरून त्यांच्यातील असलेली घनिष्ट मैत्री देखील दिसून येते.(samir choughule)

हास्यजत्रेतील या दोघांच्या स्किटला प्रेक्षकांची चांगलीच पसंतीस मिळत होती. तर प्रेक्षक विशाखाच्या प्रत्येक पोस्ट वर तुम्ही हास्यजत्रेत परत या अशा कमेंट्स करत असतात.