“मराठी मालिकेत फालतूपणा का दाखवत आहेत?” जयदीप-गौरीचा रोमँटिक सीन पाहून प्रेक्षक संतापले

jaydeep gauri romantic scene
jaydeep gauri romantic scene

मनोरंजन विश्वात चित्रपट, नाटक, मालिका या माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात. काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करतात तर काही मालिका प्रेक्षकांच्या दररोजच्या जीवनाचा एक भाग बनतात. वेगवेगळ्या वाहिन्या वेगवेगळे विषय हाताळत दररोज काहीतरी नवीन घेऊन येतात.(jaydeep gauri romantic scene)

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. या मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरक्षा डोक्यावर उचलून धरलं. बराच काळ वेगळे झालेले गौरी जयदीप अखेर आता मालिकेत एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. गौरी आणि जयदीपच्या एकत्र येण्याने प्रेक्षकही खुश असलेले पाहायला मिळत होते. मात्र यावर विरजण घालत या मालिकेला मिळत असलेली पसंती कुठेतरी कमी होताना दिसतेय आणि याचे कारणही तसेच आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरून ‘सुख म्हणजे नक्की काय’ असतं मालिकेतील गौरी आणि जयदीपचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर करण्यात आला. मात्र हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक संतापलेले पाहायला मिळत आहेत.

गौरी जयदीपच्या या ऑनस्क्रीन रोमान्सला प्रेक्षकांनी नाराजी दर्शविली आहे. गौरी व जयदीपचा ऑनस्क्रीन रोमान्स प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरल्याचं दिसत आहे. त्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत ‘सुख म्हणजे नक्की काय’ असतं मालिकेवर आक्षेप घेतलेला पाहायला मिळतोय. गौरी जयदीपचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांचा चांगलाच राग अनावर झालेला पाहायला मिळतोय. या व्हिडिओवर कमेंट करत त्यांनी थेट त्यांचा राग व्यक्त केलाय.(jaydeep gauri romantic scene)

====

हे देखील वाचा- ‘लग्नाला यायला जमलं नाही म्हणून भोजाने थेट..’ ओंकार भोजनेचं वनिताला खास सरप्राईझ

====

एका युजरने कमेंट करत असे म्हटले आहे की, “फॅमिली सोबत बघता येईल असेच व्हिडीओ दाखवत जा. जरा बघण्यासारखं. थोडी हिंट दिली तरी सगळ्यांना समजत पुढे काय होणार आहे. सो असे रोमँटिक व्हिडीओ दाखवत जाऊ नका”. तर दुसऱ्या युजरने असे म्हटले आहे की, “आम्ही फॅमिली सोबत सिरीयल बघत असतो प्लिज हे असे सीन नका टाकत जाऊ. लहान आर्टिस्ट सिरीयलमध्ये असल्यामुळे आमची छोटी मुलंही सिरीयल बघतात”. तर एका युजरने म्हटलं आहे की “मराठी मालिकेत फालतूपणा का दाखवत आहेत”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
(nava gadi nav rajya)
Read More

आनंदी करणार बिझनेस, राघव करेल का तिचा पुन्हा स्वीकार?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर…
Prajakta Mali
Read More

प्राजक्ता माळीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन!

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेत्रीने मालिका,चित्रपट आणि वेब…
Sheetal Kshirsagar
Read More

सिम्मी काकूंच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट करत दिली गुडन्यूज

शीतल क्षीरसागर ही मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अनेक मालिकांमध्ये अभिनय साकारून आपली स्वतःची…
ashok saraf siddharth jadhav
Read More

‘मी पुन्हा निरुत्तर झालो..’ असे म्हणत अशोक मामा झाले भावुक

सिनेविश्वात आपल्या अंगी असलेल्या कलेने साऱ्या रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अनेक नामवंत कलाकारांचे करावे तितके कौतुक कमीच. आजवर…
(akshaya naik)
Read More

अखेर अक्षयाच्या त्या फोटोमागील गुपित उलगडलं..

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेच्या माध्यमातून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. या मालिकेत लतिका ही भूमिका…