छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड हिंदुस्थानच प्रेरणास्रोत फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसणारी महाराजांची शौर्यगाथा संपूर्ण जगाला बोध देणारी होती. महाराजांच्या कर्तृत्वाची भुरळ पडणाऱ्या देशांच्या यादीत अजून एका देशाचं नाव सामील झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंतीच्या पवित्र दिवशी इस्राईल देशातील सांस्कृतिक विभागाकडून त्यांच्या देशातील एका रस्त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत माहिती लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि इतिहासाबद्दल आत्मीयता बाळगणारे दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या इन्टाग्राम अकाउंट वरून दिली.(Digpal lanjekar)

COSULATE विभागाकडून दिगपाल यांना आमंत्रित करण्यात आलं. या संदर्भात पोस्ट करत दिग्पाल लांजेकर म्हणतात “इस्राईल… छळाकडून बळाकडे गेलेल्या या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार उत्सुकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईल मधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे. विविध क्षेत्रांतील कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या लोकांशी चर्चा करून इस्राईल चे Consulate हे शिवरायांच्या बाबतीत माहिती गोळा करत आहेत. Consulate ऑफिस मधून आलेल्या निमंत्रणानुसार Consul general Mr. Kobbi Shoshani यांची भेट झाली. त्यावेळी त्यांच्याशी शिवरायांच्या रोमहर्षक प्रशासकीय गुणांची आणि त्यासंदर्भातील प्रसंगांची चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी दिक्पाल लांजेकर यांनी सांगितलेले मुद्दे ऐकल्यानंतर श्री. kobbi यांनी शिवरायांची प्रशंसा केली. त्यांना कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा अनुवादित ग्रंथाची इंग्रजी प्रत आणि महाराजांच्या जिरेटोपाचे स्मृतिचिन्ह श्री. दिक्पाल लांजेकर यांनी भेट दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्रिखंडात असेच गाजत राहो आणि या शिवयज्ञात सातत्याने आमच्याकडून समिधा अर्पण होत राहोत ही शिवचरणी प्रार्थना..
जय शिवराय”
====
हे देखील वाचा – ‘शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा फडकवा’अमोल कोल्हे यांचा शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार
====
दिग्पाल लांजेकर सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचे शूर सरदार यांच्या शौर्यगाथेवर शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेवर काम करत आहेत ज्यातील ४ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊन प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. तर लवकरच ‘ सुभेदार गड आला पण’ हा शिवराज अष्टकातील ५ व चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संपूर्ण देशात आपल्या राजाची गौरवगाथा ऐकून प्रत्येक भारतीयांची मान गर्वाने उंच होईल.(Digpal lanjekar)