विशाखा सुभेदार ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री असून विशाखा कोणत्या न कोणत्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतच असते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून निरोप घेतल्यांनंतर विशाखा आता “शुभविवाह” या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचबरोबर विशाखाचा कुर्रर्रर्रर्र नाटकाचा दवारा परदेशात सुरु आहे. विशाखा तिकडचे फोटोज तसेच व्हिडियोज तिच्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसतीय. विशाखाने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडियो पोस्ट केलाय. (Vishaka Subhedar New Video)
या व्हिडियोत विशाखा बर्फाळ प्रदेशाचा आनंद घेताना दिसत आहे. या व्हिडिओला विशाखाने बर्फ बर्फ बर्फ आणि मी असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी “तिकडे MHJ ची आठवण येतेय का कि शुभ विवाह ची” तसेच “फुल्ल एन्जॉय चालू आहे भो” अशा कमेंट केल्या आहेत.
हे देखील वाचा: जुई गडकरी लवकरच शेअर करणार नवऱ्याचे फोटोज् नक्की काय आहे प्रकरण
कुर्रर्र हे नाटक फॅमिली बेस नाटक आहे. या नाटकामध्ये प्रसाद खाणंदकर सोबतच विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव तसेच पॅडी कांबळे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या नाटकाच्या कथानकानुसार नम्रता ,म्हणजेच पूजाच्या लग्नाला खूप वर्ष झालेली असून देखील बाळ होत नाही. त्यात पूजेची आई त्यांच्या घरी राहत असल्यामुळे ती पूजाच्या मागे सतत लागलेली असते की, तुला बाळ कधी होणार. त्यावर पूजा आईला वारंवार समजावर असते. नंतर या नाटकात पॅडीची एंट्री होते, आता त्याच नक्की या नाटकात काय पात्र आहे, हे नाटक पाहिल्यानंतरच हे लक्षात येईल. या नाटकाचे लेखन प्रसाद खांडेकर यानेच केले आहे. (Vishaka Subhedar New Video)
हे देखील वाचा: सोनाली ‘या’ व्यक्तीसोबत खाते वर्षाचा पहिला आंबा
या आधी देखील विशाखाने एक पोस्ट शेअर केली होती. या यामध्ये विशाखा कपडे इस्त्री करताना दिसत होती.
या पोस्ट मध्ये तिने म्हंटल होत. शोसाठी गेल्यामुळे सगळी काम स्वतःच करावी लागत आहेत. सगळ्या जबाबदारी स्वतःच पेलवतोय. परंतु परदेशात प्रेक्षकांची मिळणारी “कौतुकाची थाप” समाधान देखील देत आहे. या सर्व कलाकारांना अमेरिकेत जाऊन आठ दिवस झाले असून, ते तेथील निसर्गाचा आनंद देखील घेताना दिसतायत.