महाराष्ट्राची अप्सरा म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अनेक चित्रपटांतून सोनालीने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे.गाढवाचं लग्न हा सोनालीचा पहिला चित्रपट, त्यात रंभा हे पात्र तिने साकारले होते. त्या नंतर बकुळा नामदेव घोटाळे हा सोनालीने नायिका म्हणून केलेला तिचा पहिला चित्रपट. त्या नंतर सोनालीने मागे वळून पहिले नाही.(Sonalee Kulkarni)
हाय काय नाय काय, इरादा पक्का,क्षणभर विश्रांती, मितवा असे एका पेक्षा एक चित्रपटानं मध्ये ती झळकली. नटरंग हा चित्रपट तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला असे म्हंटले तर चुकीचं ठरणार नाही. याच चित्रपटाने तिला महाराष्ट्राची अप्सरा हे ओळख मिळवून दिली. त्यातील तिचा नृत्याविष्कार कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहील. हिरकणी या चित्रपटाने तिला प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळवून दिल आहे.हिरकणी मधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटे आणते. तिच्या भूमिकांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न तिने आजवर केला आहे.
पहा सोनाली दरवर्षी कोणासोबत खाते वर्षाचा पहिला आंबा?(Sonalee Kulkarni)
नृत्यदिग्दर्शकांनमध्ये महत्वाच्या असणाऱ्या नावानं पैकी एक नाव म्हणजे फुलवा खामकर. नटरंग या चित्रपटांतून फुलवाने चित्रपटातील नुर्त्य दिग्दर्शनाला सुरुवात केली.सोनालीच्या अनेक चित्रपटानं मध्ये फुलवाने कोरिओग्राफी केली आहे. त्यामुळे त्यांचं बॉण्डिंग आणि मैत्री फार छान आहे.सोनाली तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.तिचे अनेक ग्लॅमर्स,बोल्ड ट्रेडिशनल फोटो व्हिडिओ पोस्ट करत असते. तसेच तिचे आणि फुलवाचे डान्स व्हिडिओ देखील ती शेअर करते. नुकताच सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून, प्रथेप्रमाणे असे कॅप्शन देत फुलवा सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्या दोघी आमरस बनवत आहेत. त्यात सोनालीने असे सांगितले आहे की दरवर्षी तीचा पहिला आमरस पुरीचा बेत फुलावच्या घरीच करते. आणि पहिल्यांदाच सोनाली फुलवाला आमरस बनवण्यासाठी मदत करतेय त्या वर फुलवाने अशी तक्रार केली आहे कि दरवर्षी मीच आमरस बनवते म्हणून या वेळेस मी सोनालीला मदतीला घेतल आहे. (Sonalee Kulkarni)
सोनाली आणि फुलवाची मैत्री अनेक वर्षाची आहे. एकमेकांसाठी त्या बऱ्याचदा सोशल मीडिया वर पोस्ट करत असतात.तसेच सोनाली देखील उत्तम डान्सर असल्या मुळे त्या अनेकदा त्यांचे डान्स व्हिडिओ देखील शेअर करतात. त्यांची ही नृत्याची जुगलबंदी पहायला कायमच आवडते.