सध्या सर्वत्र ‘सुभेदार’ चित्रपटाची हवा आहे. ‘सुभेदार’ या ऐतिहासिक चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवाय चित्रपटातील गाण्यांनी तर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर हवा केली आहे. या चित्रपटात कुलकर्णी कुटुंबीय एकत्र अभिनय करताना पाहायला मिळणार आहेत. अभिनेता विराजस कुलकर्णी या चित्रपटामुळे सध्या विशेष चर्चेत आहे. (Virajas Kulkarni On Ask Me Anything)
सोशल मीडियावरही विराजस बऱ्यापैकी सक्रिय असतो. तो नेहमीच काही ना काही हटके पोस्ट शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच विराजसने इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘आस्क मी एनिथिंग’चा सेशन घेतला. या प्रश्न उत्तरांच्या सेशनमध्ये विराजसने चाहत्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिली.
पाहा विराजस नेटकऱ्यांच्या कमेंटवर प्रतिउत्तर देत काय म्हणाला (Virajas Kulkarni On Ask Me Anything)
विराजसला विचारलेल्या या प्रश्न उत्तराच्या सेशनमध्ये त्यांच्या खाजगी आणि अभिनयक्षेत्रातील काही प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान चाहत्यांच्या एका प्रश्नाने आणि विराजसने त्यावर दिलेल्या उत्तराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यांत विराजसला गौतमी देशपांडे बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. गौतमी आणि विराजस यांनी ‘माझा होशील ना’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला तर या मालिकेतील विराजस आणि गौतमीच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं.
या मालिकेला, मालिकेतील सहकलाकाराला धरून विराजसला एका नेटकऱ्यानं असा प्रश्न विचारला की, गौतमी देशपांडे तुझी सहकलाकार होती तरी देखील तू तिला इन्स्टाग्रामवर फॉलो का करत नाहीस? यावर विराजसनं हटके उत्तर दिलं आहे. विराजसने हटके उत्तर देत म्हटलं, ‘कामातून ब्रेक घेण्यासाठी इन्स्टाग्राम आहे. मी इन्स्टाग्रावर फक्त मीम्सचे पेजेस फॉलो करतो, असं त्याने म्हटलं आहे.

याशिवाय एका नेटकऱ्याने प्रश्न विचारत म्हटलं आहे की, “शिवानी घरी पण अधिपती सारखं तुझं डोकं खाते का शुद्ध मराठी बोलण्यासाठी…? यावर विराजसने उत्तर देत म्हटलं आहे की, “घरी मराठीचा वारसा लाभला आहे. त्यात लेखनही चालू असतं. त्यामुळं मला फार धडे शिकवावे लागत नाहीत”.