Vandana Gupte About Raj Thackeray: ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने अक्षरशः अनेक रेकॉर्ड ब्रेक करत बॉक्सऑफिसवर तर निश्तिच चांगली कमाई केली आहे.परंतु त्याच सोबत प्रेक्षकांच्या मनात देखील या चित्रपटाविषयी, कलाकारांविषयी एक वेगळं प्रेम व आदर पाहायला मिळाला. कोणताही बोल्ड सिन, किंवा प्रमुख अभिनेता नसताना देखील चित्रपटाने एक वेगळ्या उंचीच यश गाठलं. प्रेक्षकांना जे हवं ते दिलं की प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतातच याचं ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट नक्कीच एक उत्तम उदाहरण आहे.(Vandana Gupte About Raj Thackeray)
चित्रपटातील सहा अभिनेत्रींनी उत्तम काम केलं त्याची दाद सर्व अभिनेत्रींना वेळोवेळी मिळत आहे. चित्रपटातही सहाजणींचा स्वभाव वेगळा आहे, तर अभिनेत्री वंदना गुप्ते त्यांच्या खऱ्या आयुष्यातही बेधडक व बिनधास्त स्वभावाच्या आहेत हे त्यांच्या अनेक मुखतींमधून लक्षात येतं.’बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या निमित्ताने वंदना यांनी त्यांच्या आयुष्यातले अनेक किस्से, अनुभव, प्रेक्षकांसोबत शेअर केले. सध्या त्या ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या वायरल होताना पाहायला मिळतो आहे, त्यात त्यांनी त्यांचे मित्र राज ठाकरे यांच्यासोबतच एक किस्सा सांगितला आहे.
पाहा काय म्हणाल्या वंदना गुप्ते? (Vandana Gupte About Raj Thackeray)
यावेळी अवधूत गुप्तेंनी वंदना गुप्तेंना प्रश्न विचारला, राज ठाकरेंनी गाडी थांबवून तुमच्या गाडीचं प्लास्टिक फाडलं होतं? त्यावर उत्तर देत वंदना म्हणाल्या, “मी नवीन गाडी घेऊन त्या गल्लीतून येत होते आणि राज नेमका तिथे फेऱ्या मारत होता. ही चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. तर नवीन गाडी म्हटल्यावर सीटवर, फ्लॅपवर प्लास्टिक असतंच ना… मी काय ते काढलं नव्हतं. मी गाडी घेऊन येत होते. मला बघून तो म्हणाला, ‘उतर पहिले त्या गाडीतून.’ राजनं मला उतर म्हटल्यानंतर मी त्याला म्हटलं अरे का पण?” तर तो म्हणाला, “इथे मराठी माणूस दिसतो. कशाला ते प्लास्टिक ठेवायचंय? कशाला वाचवायचंय, कुठे काही डाग पडेल याची भीती वाटते का तुला?” मग त्याच्या या प्रश्नावर मी म्हटलं,”अरे घरी जाऊन काढते. तर त्याने ऐकलं नाही. सरळ गाडीची काच खाली करायला लावली आणि फ्लॅपवरचं प्लास्टिक फराफरा ओढून फाडून टाकलं.”
हे देखील वाचा : राज ठाकरेंनी केले ‘बाईपण भारी देवा’चं कौतुक, म्हणाले, “चित्रपटाच्या यशामागे…”
राज ठाकरे यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिल्यांनंतर चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देखील दिली होती. राज ठाकरे म्हणाले.”जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा घरी येऊन बायकोला याच्या कथेबाबत सांगितले”. माझ्या पत्नीशी चर्चा करताना मी म्हणालो, “हा बायकांप्रमाणे प्रत्येक पुरुषाने पाहावा असा चित्रपट आहे. आपल्या माता-भगिनी कशामधून जात असतात हे प्रत्येक पुरुषाने समजून घेण्याची गरज आहे.” (Baipan Bhari Deva)