मराठी सिनेविश्वात अशा काही जोड्या आहेत ज्यांनी कलाक्षेत्रातील वा सहकलाकारसोबतच लगीनगाठ बांधली आहे. निवेदिता सराफ अशोक सराफ, प्रिया मराठे शंतनू मोघे, प्रिया बापट उमेश कामत, सिद्धार्थ चांदेकर मिताली मयेकर यांसारख्या अनेक जोड्या आहेत ज्यांनी मराठी सिनेविश्वातील सहकलाकारासोबत आयुष्य काढण्याचा निर्णय घेतलाय. अशीच मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेली आणि लोकप्रिय जोडी म्हणजे विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे. (Virajas Kulkarni Shivani Rangole)
हे देखील वाचा – माझं स्वप्न पूर्ण झालं,नम्रताने मानले विशाखाचे आभार
या लोकप्रिय जोडीने गेल्या वर्षी लगीनगाठ बांधली असून आज त्यांच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झालं आहे. शिवानी आणि विराजस यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांनी काहीही लपवून ठेवलं नाही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या अफेअरची गोड बातमी दिली.
शिवानी विराजसच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच ..(Virajas Kulkarni Shivani Rangole)
आज विराजस आणि शिवानीच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होताच शिवानी आणि विराजसने पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोटो पोस्ट करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये शिवानीने तीन फोटो शेअर केलेत, ज्यात आधी त्यांचा लग्नाचा फोटो आहे त्यांनतरच्या दोन फोटो हे बीच वरील आहेत. शिवानी आणि विराजस हे क्युट कपल म्हणून ओळखलं जात. ते नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावरून एकमेकांबद्दलच्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या दोघांच्या फोटोलाही चाहते भरभरून प्रेम करत असतात. शिवानी आणि विराजसच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.(Virajas Kulkarni Shivani Rangole)
गेल्यावर्षी शिवानी विराजसच्या लग्नाच्या दिवशी अक्षय तृतीया होती. यंदा अक्षय तृतीयेला मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट लक्षवेधी होती. मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून विराजस आणि शिवानीच्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. गेल्या वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विराजस-शिवानीचं लग्न झालं होत.
त्या पोस्टला प्रिय शिवानी आणि विराजस, आज अक्षय तृतीया. तिथीनुसार आज तुमचा लग्नाचा पहिला वाढदिवस,एक वर्ष झालं,हे वर्ष इतकं झटकन गेलं कि आपल्याला सर्वाना असं वाट्टेल किती वर्ष गेली आहेत.स्वप्न आणि मेहनतीमुळे हे सर्व शक्य झालं.आनंदी रहा. तुम्हाला खूप प्रेम.असे, कॅप्शन देऊन त्यांनी विराजस आणि शिवानीला लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा दिल्या.
