Vikrant Massey Troll : विक्रांत मॅसी त्याच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी अभिनेत्याने केलेल्या भाष्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे. अभिनेत्याने भारताच्या ‘तथाकथित स्वातंत्र्य’ वर भाष्य केले आहे आणि त्याचे म्हणणे कोणालाही आवडले नाही. अभिनेता पत्नीच्या पायाला हात लावल्यामुळे वादात सापडला होता आणि आता राजकीयदृष्ट्या चुकीच्या विधानामुळे अभिनेता अडचणीत आला आहे. अलीकडेच, ‘द साबरमती रिपोर्ट’ या त्याच्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करताना, अभिनेत्याने भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल काही टिप्पण्या केल्या आणि १९४७ मध्ये ब्रिटिश राजवटीपासून मिळालेल्या स्वातंत्र्याला ‘तथाकथित स्वातंत्र्य’ म्हटले.अभिनेत्याच्या या विधानावर लोक खूश दिसत नाहीत.
पॉडकास्टवर, जेव्हा तो भारताच्या आधुनिक इतिहासाबद्दल बोलला तेव्हा अभिनेता म्हणाला, “आपण हे समजून घेतले पाहिजे की आपण एक तरुण राष्ट्र आहोत. स्वातंत्र्य मिळून ७६-७७ वर्षे झाली आहेत. शेकडो वर्षांच्या दडपशाहीनंतर – मुघल, डच, फ्रेंच आणि ब्रिटीश यांच्याकडून, आपल्याला तथाकथित स्वातंत्र्य मिळाले”. अभिनेता पुढे म्हणाला, “पण हे खरंच स्वातंत्र्य होतं का? त्यांनी जे काही सोडले होते ते आम्ही सोडून दिले. मला असे वाटते की शेवटी हिंदूंना त्यांच्याच देशात त्यांची ओळख मागण्याची संधी मिळाली आहे. ओळखीच्या या संकल्पनेकडे, भावनांच्या या संकल्पनेकडे आपण कधी कधी लक्ष देत नाही. आतापर्यंतचे सर्वात मोठे युद्ध लढत आहे. आपल्या आयुष्यातील सर्व निर्णय भावनांनी आणि आपल्याला कसे वाटते यावर आधारित असतात”.
आणखी वाचा – सावत्र मुलीवर रुपाली गांगुलीचा मानहानीचा खटला, ५० कोटींची मागितली भरपाई अन्…; आरोपांनंतर मोठं पाऊल
विक्रांतच्या ‘तथाकथित’ कमेंटला इंटरनेटवर खूप ट्रोल केले जात आहे. या विधानाचा काही भाग सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर एका व्यक्तीने लिहिले, “त्याला काय झाले आहे? चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो हे सगळं बोलतोय का?”. तर एकाने थट्टा करत म्हटलं आहे की, “नवीन इतिहासकार”. काही लोकांनी तर विक्रांतला खूप काही सुनावलं आहे. आणखी एकजण म्हणाला, “लाखो लोकांच्या बलिदानानंतर मिळालेले स्वातंत्र्य त्यांना तथाकथित वाटते. त्यांच्यासारखे देशद्रोही फक्त भारतातच आढळतात”.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवी व पारूच्या जीवाला धोका, धमकीचा फोन आला अन्…; नक्की कोणापासून धोका?
अनेकांनी विक्रांतच्या विधानाची तुलना कंगना राणौतच्या आधीच्या विधानाशी केली, यांत म्हटले होते की भारताला २०१४ मध्येच ‘खरे’ स्वातंत्र्य मिळाले आहे. रंजन चंदेल दिग्दर्शित, ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये विक्रांत, रिद्धी डोगरा आणि राशी खन्ना यांच्या भूमिका आहेत. फेब्रुवारी २००२च्या कुप्रसिद्ध गोध्रा ट्रेन जाळण्याच्या घटनेवर आधारित हा चित्रपट एक थ्रिलर असल्याचे म्हटले जाते. ज्याने गुजरात दंगलीला सुरुवात केली. हा चित्रपट १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.