Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत सध्या एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळाली. मालिकेत सध्या दिवाळी विशेष भाग पाहायला मिळाले. तर एकीकडे अहिल्यादेवींची बिघडलेली तब्येत सुधारताना दिसली तर दामिनीने पारुला वेठीस धरत सगळ्यांच्या नजरेतून पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा एकदा पारूने तिच्या स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकली. शिवाय प्रियाच्याही मनात दामिनीने विष कालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अहिल्यादेवींनी प्रियाला दिलेलं सरप्राईज पाहून प्रियाचा हा गैरसमजही दूर झालेला दिसला. त्यामुळे दामिनीचा एकीकडे पर्दाफाश झाला असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये असे पाहायला मिळाले की, आता पुन्हा एकदा मालिकेत ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलं आहे. किर्लोस्कर यांच्या घरी फोन येतो आणि तो फोन पारू उचलताना दिसतेय. तेव्हा समोरुन व्यक्ती बोलणारी असते ती म्हणते, ‘आता तुमचा खरा खेळ सुरु होणार आहे. तुमचे दिवस भरले आहेत. अहिल्यादेवी आणि तुला मी काही सोडणार नाही’. अर्थातच समोरुन येणारा हा आवाज दुसरा तिसरा कोणाचाच नसून दिशाचा असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पारूच्याही मनात भीती निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळालं.
आणखी वाचा – ऐश्वर्या नारकरांच्या व्हॅनिटी बॅगमध्ये नक्की काय काय असतं?, तितीक्षा तावडेने दाखवला Inside Video
आता अहिल्यादेवींच्या जीवाला धोका असल्याने पारू अहिल्यादेवींना वेळोवेळी सावध करताना दिसतेय मात्र अहिल्यादेवी पारुला ‘निर्धास्त राहा. आपण कोणाचे चुकीचे केलं नाहीये’, असं सांगताना दिसतात. असं असलं तरी पारूला दिलेली धमकी ही कोणाची आहे हे समोर आलं नसलं तरी आवाजावरुन दिशा मालिकेत पुन्हा कमबॅक करणार असल्याचे दिसतंय. प्रीतम व दिशाचं लग्न मोडल्यानंतर दिशाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला. त्यानंतर दिशाला जेलमध्ये जावं लागलं तेव्हापासून दिशाच्या मनात किर्लोस्कर कुटुंबाबद्दल द्वेष निर्माण झाला.
आणखी वाचा – ‘राजा राणीची गं जोडी’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
आता दिशा जेलमधून बाहेर पडून किलोस्कर कुटुंबाचा नाश करु शकेल का?, पारू या सगळ्यातून किर्लोस्कर कुटुंबाला वाचवेल का?, पारू या सगळ्यातून काय तोडगा काढणार?, अहिल्यादेवींचा जीवाला धोका असतानाही पारू कोणती जोखीम पत्करणार?, हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.