बॉलिवूड अभिनेता अमीर खान नेहमी चर्चेत असलेला पाहायला मिळतो. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत राहिला आहे. २०२१ साली तो त्याची दुसरी पत्नी किरण रावबरोबर घटस्फोट घेतला. दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. लग्नाच्या १६ वर्षानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र वेगळे झाल्यानंतरदेखील किरण व आमीर हे नेहमी एकत्रित असलेले दिसून येतात. आमिरची मुलगी इरा खानच्या लग्नातदेखील दोघ एकत्रित दिसून आले होते. तसेच ‘लापता लेडीज’ चित्रपटादरम्यानही आमिर हा नेहमी किरणबरोबर असलेला दिसून आला. यामुळे माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली. (amir khan on kiran rao)
आमिरने एका मुलाखतीमध्ये किरणबद्दल भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “घटस्फोटामुळे पती-पत्नी म्हणून आम्ही वेगळे झालो आहोत. पण या सगळ्याचा आमच्या मैत्रीवर काहीही परिणाम झाला नाही. आमची पार्टनरशिपदेखील चांगली टिकून आहे”. आमिरने ‘द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’बरोबर संवाद साधला. त्यावेळी त्याने सांगितले की, “आमच्या नात्यावर घटस्फोटाचा खासगी किंवा व्यावसायिक आयुष्यावर कोणताही परिणाम झाला नाही. घटस्फोट म्हणजे तुम्ही एकमेकांपासून दूर जात असता. आम्ही पती-पत्नी म्हणून वेगळे झालो पण माणूस म्हणून आम्ही कधीही दूर झालो नाही. पण आम्हाला कोणतीही समस्या आली नाही”.
तसेच घटस्फोटानंतर किरणबरोबर काम करण्याबद्दल आमिर म्हणाला की, “घटस्फोट ही एक वेगळी गोष्ट आहे. प्रत्येकाची विचारशक्ती ही वेगळी असते. पण आमची विचार करण्याची पद्धत मात्र सारखीच आहे. माझे आणि किरणचे विचार जुळतात. यामुळेच आम्ही एकत्र असताना चांगले काम करु शकतो. आमच्यामध्ये कधीही थोडे वाद झाले तर आम्ही ते बसून मिटवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही एकमेकांचा आदर करतो”.
आमीर व किरण हे २००५ साली लग्नबंधनात अडकले होते. त्यांचा एक मुलगापण आहे त्याचे नाव आझाद आहे. लग्नाच्या १६ वर्षानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.