एखादा कलाकार चित्रपट, नाटक किंवा मालिका यांमध्ये भूमिका करत असताना त्याच्या उत्तम कामाने प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो. त्या प्रोजेक्ट मधील त्याची भुमिका लहान असो वा मोठी काम चांगल असेल तर प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळतेच. मग त्या कलाकाराची ती भूमिका संपली तरी प्रेक्षकांना वाईट वाटणं सहाजिकच. (Vijaya Babar Exit From Serial)
पहा मालिकेतून एक्झिट घेण्याबाबत काय म्हणाली विजया बाबर (Vijaya Babar Exit From Serial)
सध्या आध्यात्मिक मालिकांच्या विश्वात अग्रेसर असणारी मालिका म्हणजे कलर्स मराठी वाहिनी वरील जय जय स्वामी समर्थ. भक्तीमय वातावरणाने ही मालिका संपुर्ण महाराष्ट्र भर पाहिली जाते. स्वामी समर्थ यांची भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय मुदवाडकर हे प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत सोबतच आणखी एक पात्र अस आहे जे देखील प्रेक्षकांना आवडल्याच पाहायला मिळतंय ते पात्र म्हणजे ‘ चंदा ‘. जय जय स्वामी समर्थ या मालिकेत चंदा हे अभिनेत्री विजया बाबर हिने साकारल आहे.
हे देखील वाचा – राज कावेरीची सायकलस्वारी bts फोटो आले समोर
रंगभूमी गाजवल्या नंतर विजयाचा या मालिकेत खरा प्रवास सुरू झाला आणि याच मालिकेने तिला खरी ओळख दिली. पण आता चंदा हे पात्र मालिकेतून निरोप घेत असल्याचं समोर आलं आहे. विजयाने या बाबत एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. पोस्टच्या कॅप्शन मध्ये तिने लिहिलं आहे ‘आज जय जय स्वामी समर्थ या मलिकेतला चंदाचा प्रवास संपला. पण खर्या अर्थाने माझा प्रवास सुरू झाला. माझ्या स्वप्नांची सुरूवात या मालिकेपासुन झाली याचा मला खुप आनंद आहे.'(Vijaya Babar Exit From Serial)
पण जाता जाता तिने आनंदाची बातमी देखील चाहत्यांसाठी शेअर केली आहे ‘ भेटू लवकरच नव्या भूमिकेत ‘ अस म्हणत तीने नवीन प्रोजेक्ट करणार असल्याचं सांगितलं आहे.