भाग्य दिले तू मला ही मालिका सध्या अनपेक्षित वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतेय. या मालिकेतील राज कावेरीची जोडी तर प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलीय. एकमेकांना साथ देत, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे राज आणि कावेरी नेहमीच उभे असलेले पाहायला मिळतात त्यामुळे त्यांच्यातला बॉण्ड हा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय. आता मालिकेत नवा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे.(Bhagya Dile Tu Mala New Twist)
पहा राज कावेरीचे नवीन bts फोटो (Bhagya Dile Tu Mala New Twist)
माहेरचा चहा सुरु करण्याची जिद्द कावेरीला शांत बसू देत नाही. त्यामुळे कावेरी माहेरच्या चहाची टपरी सुरु करते आणि राज रत्नमाला यांना सरप्राईझ देते. कावेरीचं हे सरप्राईझ पाहून राज, रत्नमाला आणि इतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. कावेरीचं जिद्द आणि नवी सुरुवात पाहून सगळेचजण तीच कौतुक करतात. मात्र चहाची टपरी सुरु केल्यापासून त्यांच्या टपरीवर एकही गिऱ्हाईक येत नाही, तेव्हा कावेरीचं यावर तोडगा काढते.

कावेरी सायकलवरून चहा विकायचा निर्णय घेते. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओ आणि फोटोंवरून असं कळतंय की, कावेरी सायकलवरून चहा विकतेय ही गोष्ट जेव्हा राजला कळते तेव्हा तो कावेरीला सपोर्ट करतो. आणि स्वतः सायकल चालवत कावेरीला घेऊन चहा विकायला जातो. सायकलवरून चहा विकायला जातानाचे त्यांचे हे फोटो, व्हिडीओ चांगलेच व्हायरल झालेत. त्यांची ही जोडी एकत्र संकटाच्या वेळीही पाहणं रंजक ठरतंय.(Bhagya Dile Tu Mala New Twist)
हे देखील वाचा – सानिया आणि वैदेहीचंऑफस्क्रीन ट्विनिंग

मोहितेंच्या कुटुंबावर ओढवलेल्या संकटाला सामोर जाण्याची जिद्द ही कावेरीमुळे सर्वांकडे येते. त्यानंतर कावेरी आपल्या कुटूंबाला सांभाळत या समस्यांवर तोडगा काढत योग्य तो निर्णय घेते आणि चाची टपरी सुरु करते. आता कावेरी आणि इतर सगळ्यांनी मिळून केलेली ही चहाची टपरी माहेरच्या चहाची उणीव भरून काढत नव्याने माहेरच्या चहा उभा कसा करणार हे पाहून मॉईकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.
