छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १७’ संपून आता जवळपास एक आठवडा व्हायला आला आहे, तरीदेखील त्याची क्रेझ अजून कमी झालेली नाही. बिग बॉस १७ संपल्यानंतरही घरातील स्पर्धक काहीना काही कारणांवरून चर्चेत आहेत. ‘बिग बॉस’ संपल्यानंतर घरातील स्पर्धकांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आणि या मुलाखतींतून ते काही खुलासे करत आहेत. अशातच विकी जैननेही नुकतीच एक मुलाखत दिली. यात त्याने पर्सनल व प्रोफेशनल आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.
या मुलाखतीत विकीने पत्नी अंकिता लोखंडे व नावेद सोलबरोबरच्या व्हायरल व्हिडीओबद्दलही त्याचे मत मांडले. नुकताच अंकिता व नावेद सोलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते दोघेही नृत्य करत असून नावेद अंकिताला कीसही करत आहे. याच व्हिडीओबद्दल ‘टेलिचक्कर’शी बोलताना विकी म्हणाला, “त्यांना पाहून मला अजिबात असुरक्षित वाटले नाही. नावेद त्याच्या आवडी-निवडीबद्दल नेहमीच उघडपणे बोलतो. त्यामुळे अंकिता व त्याच्यात एक वेगळेच नातं निर्माण झाले आहेत. आम्ही इतर जोडप्यांपेक्षा वेगळे आहोत. आम्ही जसे आहोत तसे वागतो. आम्ही आमच्या नात्याबद्दल जास्त विचार करत नाही आणि त्यामुळेच वाद निर्माण होतात. लोक आम्हाला उगाच जज करतात. आमच्यात सर्व काही ठीक आहे आणि आम्हाला एकमेकांच्या गोष्टींविषयी खात्री आहे”.
यापुढे विकीला त्याने ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेतल्याबद्दल पश्चात्ताप आहे का? याबद्दल विचारण्यात आले. कारण आधी तू अंकिताला ज्याप्रकारे पाठिंबा देत होतास्, त्यावरून तुला चांगले म्हटले जायचे. पण या घरात येताच तुला वाईट म्हटले गेले. यावर विकी म्हणाला की, “मला वाटते की लोकांना तुम्हाला नेहमीच चांगले बघायचे असते. कोणालाच आपल्या आयुष्यात कोणतीही समस्या नको असते. त्यामुळे जेव्हा आमच्यात भांडणं किंवा वाद व्हायचे तेव्हा लोकांनाही वाईट वाटत होते. आता ‘बिग बॉस’मध्ये एक वेगळेच वातावरण असते आणि हा एक असा शो आहे जिथे तुमच्या नात्याचे सर्वात वाईट भागच दाखवले जातात. अर्थात या शोमध्ये जे काही झाले ते चांगले झाले नाही. मला या शोमधून खूप प्रेम मिळाले आहे. त्यामुळे मला आता याबद्दल कोणतीही खंत नाही”.
दरम्यान, ‘बिग बॉस १७’च्या शोमधून अंकिता-विकी यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. अनेकद त्यांच्यात भांडणंदेखील झाले. अशातच या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा त्यांच्या नात्याबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत असताना स्वत: विकी जैनने याबद्दल भाष्य केलं आहे.